IMPIMP

Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृध्दी योजनेत खाते असेल तर करा हे काम; अन्यथा मिळणार नाही व्याज

by nagesh
Sukanya Samriddhi Yojana | sukanya samriddhi yojana hack to get more interest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  जर तुम्ही सुकन्या समृध्दी योजनेअंतर्गत (Sukanya Samriddhi Yojana) खाते उघडले असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. त्याशिवाय जे या योजनेतून खाते उघडू इच्छितात त्यांच्या देखील कामाची ही माहिती आहे. यातील माहिती एका प्रसंगामार्फत समजून घेऊया..

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राहुल आणि सूरज नावाच्या दोन व्यक्तींनी आपल्या मुलींच्या नावाने सुकन्या योजनेत खातं उघडलं. त्यासाठी आवश्यक ती सगळी कागदपत्र जमा करून त्यांनी खातं सुरूही केलं. दोघंही एकसारखी रक्कम खात्यावर दर महिन्याला जमा करतात. मात्र तरी राहुलला जास्त व्याज मिळतं. सूरजला मात्र व्याज कमी मिळतं यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया. (Sukanya Samriddhi Yojana)

 

राहुलने सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडल्यानंतर राहुल त्यांच्या मुलीच्या नावे असलेल्या खात्यात 1-10 तारखेपर्यंत पैसे जमा केले. तर सूरजने महिन्याची 10 तारीख उलटून गेल्यानंतर रक्कम जमा केली. त्यामुळे जेव्हा सुकन्या समृद्धी योजनेचं व्याज येतं तेव्हा ते 1-10 मध्ये जर पैसे जमा केले तरच महिन्याभराचं व्याज तुम्हाला मिळतं. आणि तेच जर रक्कम उशिरा जमा केली तर त्या महिन्याचं व्याज त्याला मिळत नाही. तर थेट पुढच्या महिन्याचं व्याज मिळतं. (Sukanya Samriddhi Yojana)

तुम्ही जर अशीच चूक करत असाल तर ती चूक वेळीच सुधारा कारण यामुळे तुमचंही एका महिन्याचं नुकसान
होत आहे. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेसाठी पैसे भरताना ते 1-10 तारखेदरम्यान खात्यात जमा होतील याची काळजी घ्या. आणि नियमीत वेळच्या वेळी रक्कम खात्यात भरत जा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुकन्या समृध्दी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 80C अंतर्गत आयकरातून सूट देण्यात आली आहे.
तसेच या योजनेला सरकार व्याज देखील देते त्यामुळे ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक आहे.
सुकन्या समृध्दी योजनेचे खाते आपण पोस्ट किंवा कोणत्याही बँकेत उघडू शकता.

 

Web Title :-  Sukanya Samriddhi Yojana | sukanya samriddhi yojana hack to get more interest

 

हे देखील वाचा :

RBI | KYC बाबत आरबीआय कडून मोठी घोषणा! जाणून घ्या काय आहे आरबीआयची ग्राहकांसाठीची घोषणा

Lingayat Community | लिंगायत समाजाचा २९ जानेवारीला मुंबईत विधानभवनावर महामोर्चा

Pune NCP News | ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार यांचे पुण्यात मोठ्या जल्लोषात स्वागत व सत्कार

 

Related Posts