IMPIMP

Lingayat Community | लिंगायत समाजाचा २९ जानेवारीला मुंबईत विधानभवनावर महामोर्चा

by nagesh
Lingayat Community | Lingayat community march on Vidhan Bhavan in Mumbai on January 29

सरकारसत्ता ऑनलाईन  –   लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी येत्या २९ जानेवारीला मुंबईत विधानभवनावर
महामोर्चा काढला जाणार आहेत. अशी माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत
दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोर्चाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी इचलकरंजी येथील लिंगनगुडी या ठिकाणी भोसीकर यांनी बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. देशभरात ८ कोटीहून अधिक लिंगायत समाज बांधव आहेत. लिंगायत समाज आपल्या न्याय हक्कासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा, लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक त्वरीत पूर्ण करावे, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, विधान भवान परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभा करावा अशी मागणी समाजाच्या वतीनं शासनाकडं सातत्यानं केली जात आहे. परंतु याकडे शासनानं दुर्लक्ष केलयं. त्यामुळे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे. असे ही भोसीकर यांनी सांगितले.

 

या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून २५ हजार लिंगायत बांधव सहभागी होणार असल्याचं
कोल्हापूर शहर अध्यक्ष संतोष तोडकर यांनी सांगितलं. २९ जानेवारीला मुंबईत विधानभवनावर काढल्या जाणा-या
या महामोर्चाला कोल्हापूर जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं,
असं आवाहन लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलयं. या पत्रकार बैठकीला लिंगायत धर्म महासभेचे राज्य चिटणीस बी. एस. पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली माळी, महिला शहर अध्यक्ष गीता वडगुले, कोल्हापूर शहर अध्यक्ष संतोष तोडकर, काशिनाथ माळी उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Lingayat Community | Lingayat community march on Vidhan Bhavan in Mumbai on January 29

 

हे देखील वाचा :

Pune NCP News | ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार यांचे पुण्यात मोठ्या जल्लोषात स्वागत व सत्कार

NCP MLA Jitendra Awhad | ‘…म्हणून ते ट्विट डिलीट केले’, स्पष्टीकरण देताना जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला, म्हणाले-‘तुम करो तो रास लीला, हम करे तो…’

Maharashtra Politics | नाशिक पाठोपाठ ठाकरे गटाला परभणीत मोठा धक्का! एवढ्या नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

 

Related Posts