IMPIMP

MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’

by nagesh
MP Sanjay Raut | thackeray faction sanjay raut on shinde faction shivsena bhavan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयात घुसून ताबा घेतला. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. पालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) पक्ष कार्यालयात ताब्यात घेतल्यानंतर शिंदे गट शिवसेना भवनही (Shiv Sena Bhavan) ताब्यात घेऊ शकतो अशी चर्चा सरु झाली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांचे बाप आले पाहिजेत अशा भाषेत संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) शिंदे गटावर हल्लाबोल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना भवन शिंदे गट ताब्यात घेणार अशी चर्चा आहे, असं विचारलं. त्यावर राऊत म्हणाले त्यांचे बाप आले पाहिजेत. जर त्यांचा बाप असेल तर येतील. एक बाप असेल तर येतील, हे मी ऑन रेकॉर्ड सांगत असल्याचे त्यांनी सांगितले.

जर वातावरण बिघडवायचं असेल तर…

शिवसेना भवनाचा ताबा कोण घेणार? शिवसेना भवन शिवसैनिकांचे आहे, बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) या वास्तूची उभारणी केली आहे. ती बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने राहिल. ती आमची आहे. अशा अनेक घोषणा, वल्गना होतात. तुमच्याकडे औटघटकेची सत्ता आहे ती सांभाळा. अशी भाषा वापरली तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडले. आणि जर तुम्हाला वातावरण बिघडवायचे असेल तर आमची तयारी आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

 

ते घुसखोरच आहेत

काल पालिकेत सगळे नाही, काही मोजकेच गेले होते. परंतु जे गेले ते घुसखोरच आहेत.
ते सगळीकडे घुसखोरी करत असतात. पालिका कार्यालय सील केली आहेत कशी केली गेली ही हुकूमशाही आहे.
एकदा तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात भाजपवाले (BJP) कसे घुसतील हे लवकरच कळेल असे राऊत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | thackeray faction sanjay raut on shinde faction shivsena bhavan

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | हिंदी मालिकांमध्ये काम देण्यासाठी ऑडिशनच्या नावाखाली तरुणीची 71 हजारांची फसवणूक; अनेकांना गंडा घातला असण्याचा संशय

Pune Cyber Crime News | ‘फास्ट’ घरपोच तिकीट मागविताना खात्यातून गेले ९० हजार FAST; सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Aurangabad Crime | उद्योग मंत्र्यांच्या नावाने गुन्हेगारांचा ‘उद्योग’, नोकरीचे आमिष दाखवून महिलेने उकळले 20 लाख

 

Related Posts