IMPIMP

MP Sanjay Raut | अजामीनपात्र वॉरंट जारी होताच संजय राऊत कोर्टात हजर, कोर्टानं वॉरंट केलं रद्द

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut used the wrong word for bjp leader narayan rane

मुंबई  : सरकारसत्ता ऑनलाईन   मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं (Shivdi Magistrate Court) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी (Non-Bailable Warrant Issue) केले होते. वॉरंट जारी होताच संजय राऊत तातडीने कोर्टात हजर झाले. राऊत (MP Sanjay Raut) कोर्टात हजर झाल्याने त्यांच्या विरुद्ध जारी करण्यात आलेले वॉरंट कोर्टाने रद्द केले आहे. अब्रुनुकसानीच्या दाव्यावरील सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने अखेर न्यायालयाने तक्रारदार यांच्या विनंतीवरुन ही कारवाई केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळा (Toilet Scam) केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. जोपर्यंत वॉरंट जारी करत नाही तोपर्यंत राऊत हजर होणार नाहीत, असा युक्तीवाद मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी केला होता. तक्रारदार यांच्या विनंतीवरुन दंडाधिकारी पी.आय मोकाशी (Magistrate PI Mokashi) यांनी राऊत यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या सुनावणीत न्यायालयाने मेधा सोमय्यांचा जबाब नोंदवून घेतला आणि पुढील खटल्याची तारीख 24 जानेवारी रोजी निश्चित केली.

 

मेधा सोमय्यांनी कोर्टात नोंदवला जबाब

कोर्टाने शुक्रवारी मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवला. संजय राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप करुन माझी
बदनामी केली. त्यामुळे मी राऊत यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
राऊत यांनी 12 एप्रिल 2022 रोजी सामना ऑनलाईनमध्ये एक लेख लिहिला होता.
यामध्ये त्यांनी माझ्यावर कोट्यावधींचा शौचालय घोटाळा केल्याच खोटा आरोप केला होता.
ज्यामुळे माझी बदनामी झाली, असे मेधा सोमय्या यांनी कोर्टात सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | update on defamation case filed by somayya against sanjay raut at shivdi court

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांचा अंबादास दाणवेंवर पलटवार म्हणाले, ‘यांना तर…’

Pune PMC News | पुणे महापालिकेचा अंदाजपत्रकाचा मुहूर्त टळणार ! मुदतवाढीसंदर्भात स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Pune Voter News | पुणे जिल्ह्यात 79 लाख 51 हजार 420 मतदार; मतदार संख्येत 74 हजार 470 ची वाढ

 

Related Posts