IMPIMP

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांचा अंबादास दाणवेंवर पलटवार म्हणाले, ‘यांना तर…’

by nagesh
Abdul Sattar | abdul sattar attacks on ambadas danve said those who have two wives should be beaten with a shoe

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन   शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंनी काल वैजापूर येथील सभेला संबोधीत करताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आज (दि.६) अहमदनगर मधील राहुरीत बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) देखील अंबादास दानवेंवर जोरदार पलटवार केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंबादास दानवे हे वैजापूर येथील सभेत बोलताना म्हणाले होते की, ‘आमदार वाणीसाहेब असते तर खोके घेणाऱ्यांना बुटाने मारलं असतं’. असा घणाघात त्यांनी नाव न घेता कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर केला होता. त्यावर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील कठोर शब्दात अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे.

 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, ‘ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या आहेत त्यांना बुटानेच मारले पाहिजे. त्यांना दोन बायका करण्याचा अधिकार हिंदू धर्माने दिला आहे का?
तसेच जर अधिकार असेल तर मारु नका, नसेल तर त्यांना जरुर मारा.
कारण त्यांनी विधानपरिषदेच्या शपथपत्रात त्यांना दोन बायका असल्याचं लिहून दिलं आहे.
’ असा घणाघात त्यांनी विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंवर केला.
ते राहुरी येथे आयोजीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 36 वा पदवीदान समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभाला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांची उपस्थिती होती. तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ऑनलाईन हजर होते.

 

दरम्यान, नाशिक येथे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
त्यावर बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले,
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. अनेक पक्षातील लोक त्यांच्या कामावर खुश आहेत.
एकनाथ शिंदे हे गतिमान सरकार चालवत आहेत.
जनतेचा मुख्यमंत्री म्हणून सहज उपलब्ध असलेले अशी त्यांची ओळख आहे.
त्यावर विश्वास ठेवून राज्यभरातील अनेक पक्षातील लोक येण्यास तयार आहेत.
राजकीय परिवर्तनासाठी भविष्यात अनेक लोक शिंदे गटात येतील.’ असे देखील कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Abdul Sattar | abdul sattar attacks on ambadas danve said those who have two wives should be beaten with a shoe

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | पुणे महापालिकेचा अंदाजपत्रकाचा मुहूर्त टळणार ! मुदतवाढीसंदर्भात स्थायी समितीसमोर प्रस्ताव

CM Yogi Adityanath On Mumbai Visit | ‘योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक…’

Pune Voter News | पुणे जिल्ह्यात 79 लाख 51 हजार 420 मतदार; मतदार संख्येत 74 हजार 470 ची वाढ

 

Related Posts