IMPIMP

MPSC Exam | 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

by nagesh
MPSC Exam 2023 | good news for competitive examinees more than 8 thousand posts recruitment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MPSC Exam | कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. दोन वर्ष झाली कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना वाव मिळेना. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC Exam) रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी जाहीर केली होती. मात्र आता ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

2 जानेवारीला होणारी नियोजित एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, परीक्षेचा (MPSC Exam) सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. परिक्षा पुढे ढकलल्याने नवं वेळापत्रक जाहीर होणार आहे.

 

Web Title : MPSC Exam | The MPSC exam scheduled for January 2 has been postponed

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात जादुटोणा करण्याची भिती दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला वाकड पोलिसांकडून अटक

Pune Vehicle sales | पुण्यात 6 महिन्यांत 63 हजारांहून जादा वाहनांची विक्री

PM Modi’s New Bulletproof Car | बॉम्ब अन् गोळ्या देखील निष्प्रभ ! पंतप्रधान मोदींना मिळाली 12 कोटींची बुलेट प्रूफ कार, फीचर्स जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

 

Related Posts