IMPIMP

PM Modi’s New Bulletproof Car | बॉम्ब अन् गोळ्या देखील निष्प्रभ ! पंतप्रधान मोदींना मिळाली 12 कोटींची बुलेट प्रूफ कार, फीचर्स जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

by nagesh
PM Modi's New Bulletproof Car | PM modi gets bulletproof car maybach 650 guard pm modi yanchi navin bulletproff car

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Modi’s New Bulletproof Car | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) रक्षक दलातील वाहनांमध्ये आणखी एका बुलेट प्रूफ कारचा समावेश झाला आहे. मर्सिडीज-मेबॅक एस 650 (Mercedes-Maybach S650) असे या नव्या लक्झरी कारचे नाव आहे, जी अत्याधुनिक फीचर्सनि बनली आहे. यापूर्वी पंतप्रधानांना ‘रेंज रोव्हर वोग'(Range Rover), ‘टोयोटा लँड’ (Toyota) क्रूझर्सवर सावर होताना पहिले आहे. परंतु जेव्हापासून पंतप्रधान नवीन कारमधून (PM Modi’s New Bulletproof Car) उतरताना दिसले, तेव्हापासून ही कार इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वात सुरक्षित कार आहे, असे प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत. चला तर जाणून घेऊयात या कारचे फीचर्स.

 

 

Join our Sarkarsatta , WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

Mercedes-Maybach S650 Guard VR10 –
ही लक्झरी कार मर्सिडीजची लेटेस्ट कार आहे, ज्यामध्ये लेव्हल प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की या कारमध्ये (PM Modi’s New Bulletproof Car) इतर कारच्या तुलनेत जास्त प्रोटेक्शन लेव्हल आहे. मर्सिडीज-मेबॅक ची खासियत म्हणजे त्याची संरक्षण यंत्रणा. वृत्तानुसार Mercedes-Maybach ने गेल्या वर्षी भारतात S600 Guard ला 10.5 कोटी रुपयेला लाँच केले होते आणि Mercedes-Maybach S650 ची किंमत 12 कोटी रुपयेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

अत्याधुनिक सुविधा –
Mercedes-Maybach S650 Guard कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
मर्सिडीज-मेबॅक कारची बॉडी आणि खिडक्या कोणत्याही बुलेट किंवा बॉम्ब पासून सरंक्षण करतात.
अतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टीने, याला 2010 एक्स्प्लोजन प्रूफ व्हेईकल (ERV) रेटिंग मिळाले आहे आणि
गाडीतील लोक केवळ 2 मीटर अंतरावरुन 15kg TNT स्फोटापासून देखील संरक्षित राहतील.
या गाडीला चारही बाजूंनी संरक्षण मिळावे यासाठी खूप नियोजन करून ती तयार करण्यात आली आहे.
उदाहरणार्थ, गॅस हल्ला झाल्यास सुरक्षा देणे, दारुगोळ्यासह हल्ला झाल्यास सुरक्षा देणे इ.

 

 

 

Join our Sarkarsatta , WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

या कारची इंधन टाकी एका विशिष्ट सामग्रीने बनवलेली आहे जे आदळल्या नंतर आपोआप छिद्र सील करते.
बोईंग त्याच्या AH-64 अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टर साठी वापरते त्याच सामग्रीपासून ते तयार केले आहे.
हे स्पेशल रन-फ्लॅट टायर्सवर देखील चालते जे टायर्स खराब झाल्यास किंवा सपाट होण्याच्या स्थितीत चालू राहतात, ज्यामुळे त्वरित सुटका सुनिश्चित होते.

 

इंजिन
Mercedes-Maybach S650 Guard मध्ये 6.0-लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिन दिलेले आहे जे 516bhp आणि
सुमारे 900Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर त्याची वेग मर्यादा 160 किमी प्रतितास आहे.

 

Web Title :- PM Modi’s New Bulletproof Car | PM modi gets bulletproof car maybach 650 guard pm modi yanchi navin bulletproff car

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | 200 एस.टी. कामगारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

Ajit Pawar | ‘मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहुदे’ – अजित पवार

Ajit Pawar | एखादा सदस्य चुकला तर 12-12 महिने बाहेर पाठवू नका, भाजपच्या ‘त्या’ 12 आमदारांच्या निलंबनाविरुद्ध अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन

 

Related Posts