IMPIMP

Mukesh Ambani News | मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचा दिला राजीनामा, आकाश अंबानी बनले कंपनीचे चेअरमन

by nagesh
Mukesh Ambani | death threat to mukesh ambani and his family

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMukesh Ambani News | आशिया आणि भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) मध्ये मोठा बदल झाला आहे. मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) यांना कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. (Mukesh Ambani News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बाजार नियामक सेबी (SEBI) ला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की बोर्डाची बैठक 27 जून 2022 रोजी झाली. यामध्ये रिलायन्स जिओच्या बोर्डाने आकाश अंबानी यांच्या बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्तीला मान्यता दिली. रिलायन्सच्या AGM (RIL AGM) च्या आधी ही घोषणा करण्यात आली आहे.

पंकज मोहन पवार यांना पुढील पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही. चौधरी यांना पाच वर्षांसाठी संचालक करण्यात आले आहे. (Mukesh Ambani News)

त्यांची नियुक्ती 27 जून 2022 पासून प्रभावी मानली जाईल. सेबीला दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांनी 27 जून 2022 रोजी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. रिलायन्स जिओचे नवे चेअरमन आकाश अंबानी याआधी कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते.

जिओने अलिकडच्या वर्षांत डिजिटल क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे अधिग्रहन केले आहे. यामध्ये आकाश अंबानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच वेळी, नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता. यामध्ये एआय-एमएल आणि ब्लॉकचेनचा समावेश आहे. जिओच्या 4 जी टेक्नॉलॉजीशी संबंधीत डिजिटल इकोसिस्टम तयार करण्यातही त्यांची महत्वाची भूमिका होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आकाश अंबानी यांची जबाबदारी

रिलायन्स जिओचे नवे चेअरमन आकाश अंबानी याआधी कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते.
मुकेश अंबानी हे प्रमुख कंपनी Jio Platforms Ltd चे चेअरमन म्हणून कायम राहतील.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमकडे डिजिटल सर्व्हिस ब्रँड जिओचा मालकी हक्क जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडकडेच आहे.
मुकेश अंबानी यांचा राजीनामा आणि आकाश अंबानी यांच्या नियुक्तीकडे नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

आकाश यांनी 2014 मध्ये ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली.
त्यानंतर ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात उतरले. Jio Platforms, Jio Limited, Saavn Media, Jio Infocomm,
Reliance Retail Ventures बोर्डावर आहेत. 2019 मध्ये श्लोका मेहतासोबत लग्न केले.

आकाश अंबानी यांना अशावेळी रिलायन्स जिओचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे जेव्हा देशात येत्या काही महिन्यांत 5 जी नेटवर्क सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
देशातील टेलिकॉम कंपन्यांना अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यूवर यूजर वाढण्याची अपेक्षा आहे, जे या उद्योगातील नफ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
मंगळवारी कंपनीचा शेअर बीएसईवर 1.5 टक्क्यांनी वाढून रु.2,529 वर बंद झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Mukesh Ambani News | mukesh ambani resigns as director of reliance jio akash ambani named chairman

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | उरुळी देवाची व फुरसुंगी टी.पी. स्किम बाह्यवळण मार्गाची रुंदी कमी करण्याच्या हरकती, सूचनांवर लवकरच सुनावणी

Maharashtra Police Recruitment | राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार; गृहविभागाची अधिसूचना जारी

Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Related Posts