IMPIMP

‘त्या’ दिवशी मुकेश अंबानी यांना टेलिग्रामवर आला तिहार जेलमधून धमकीचा मेसेज

by pranjalishirish
mukesh-ambani-telegram-threatening-mukesh-ambani-conspiracy-has-been-hatched-tihar-jail

सरकारसत्ता ऑनलाइन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर 25 फेब्रुवारी रोजी संशयित स्कॉर्पिओ सापडली होती. यात 20 जिलेटीनच्या कांड्या होत्या, बोगस नंबर प्लेट्स आणि धमकीचं पत्र सापडलं होतं. यानंतर अंबानी  Mukesh Ambani यांच्या मोबाईलवर धमकीचा टेलिग्राम मेसेज आल्याचंही समोर आलं होतं, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता तपासात असं समोर आलं आहे की, अंबांनी यांना आलेला धमकीचा मेसेज हा दिल्लीतील तिहार जेलमधील बराकमध्ये वापरत असलेल्या मोबाईलमधून आला आहे.

संबंधित फोन नंबर हा तिहार जेलमध्ये वापरला जात असल्यानं आता दिल्ली पोलीस याचा तपास करत आहेत. बराकमध्ये जैश ए मोहम्मद, इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन दहशतवाद्यांसह 15 जण हा मोबाईल वापरत असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. याच दहशतवाद्यांपैकी कोणी एकानं अंबानी यांना धमकीचा टेलिग्राम मेसेज केला होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी टेलिग्राम चॅनल तयार करण्यात आले होते आणि अंबानींच्या Mukesh Ambani निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ ठेवल्याची जबाबदारी घेणारा मेसेज हा 27 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अंबानींच्या टेलिग्राम मेसेंजिंग अॅपवर पाठवण्यात आला होता. यात क्रिप्टोकरन्सीत पैसे पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. ती जमा करण्यासाठी एक लिंकदेखील यात देण्यात आली होती.

पैसे पाठवण्यासाठी दिलेली लिंक उपलब्ध नाही असं चौकशीत समोर आलं आहे. त्यामुळं तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानं असंही सांगितलं की, कुणीतरी त्रास देण्यासाठी हे केलं असावं. 28 फेब्रुवारी रोजी जैश उल हिंदचा आणखी एक मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आला आणि घराबाहेर सापडलेल्या त्या स्कॉर्पिओ प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नाही असा दावा केला गेला.

सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा तपास केला होता. नंतर गृहमंत्र्यांनी याचा तपास एटीएसकडे सोपवला. नंतर एटीएसकडून हा तपास केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएकडे वळवण्यात आला.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात च

Related Posts