IMPIMP

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

by nagesh
Mumbai Ahmedabad Highway Accident | car collided with a bus on the mumbai ahmedabad highway 4 people died on the spot

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai
Ahmedabad Highway Accident) कार आणि लक्झरी बसचा असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच
मृत्यू झाला आहे. तर बाकी जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात (Mumbai Ahmedabad
Highway Accident) मृत पावलेल्यांमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ पहाटे तीन-साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात (Mumbai Ahmedabad Highway Accident) झाला आहे. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने लक्झरी बसला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर लक्झरी बसचालकासह अन्य तीन प्रवाशी जखमी झाले आहेत.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद अब्दुल कलाम सलाम हाफिज (36), इब्राहिम दाऊद (60), आशियाबेन कलेक्टर (57),
इस्माईल मोहम्मद देराय (42), अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
कारमधील चारही प्रवासी हे गुजरातच्या बारडोली मधील रहिवाशी होते.
या अपघातातील (Accident News) जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात कारचे आणि बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mumbai Ahmedabad Highway Accident | car collided with a bus on the mumbai ahmedabad highway 4 people died on the spot

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये 7 पिस्टल व 9 जिवंत काडतुसे जप्त

 

Related Posts