IMPIMP

Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये 7 पिस्टल व 9 जिवंत काडतुसे जप्त

by nagesh
Nanded Crime News | a friend firing a friend at an ongoing party in nanded

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime News | पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने (Pimpri-Chinchwad Crime Branch) तीन कारवाया करत 7 पिस्टल (Pistol) व 9 जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. याप्रकरणी (Pune Pimpri Crime News) रविवारी (दि.29) सहा जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

गुन्हे शाखा युनिट चारच्या (Crime Branch Unit 4) पथकाने दिघी पोलीस ठाण्याच्या (Dighi Police Station) हद्दीत चऱ्होली फाट्याजवळ शनिवारी (दि.28) रात्री अकरा वाजता कारवाई केली. या कारवाईत अक्षय रवी पाखरे (वय-22 रा. निकाळजे चाळ, म्हाळुंगे इंगळे, पुणे), प्रविण भारत म्हस्के (वय-20 रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांना अटक करुन त्यांच्याकडून 1 लाख 4 हजार हजारांच्या दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. (Pune Pimpri Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) आळंदी पोलीस ठाण्याच्या (Alandi Police Station)
हद्दीत शनिवारी (दि.28) रात्री अकराच्या सुमारास कारवाई करुन तिघांना अटक केली.
रामदास सुरेश सुकळे (वय-39 रा. तेली आळी, खेड), रियाज हुसेन शेख (वय-22 रा. मु.पो. पडाळी, ता. खेड),
तुषार उर्फ डेल्या शांताराम टेके (वय-24 रा. मु.पो. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव)
यांना अटक करुन 1 लाख 77 हजार 510 रुपये किंमतीचे 4 पिस्टल व 5 जिवंत काडतुसे जप्त जप्त केली.

 

गुन्हे शाखा युनिट चारने दुसरी कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station)
हद्दीतील शेख वस्ती येथे रविवारी (दि.29) पहाटे सव्वाचार वाजता केली.
तुषार महिपती मगर (वय-24 रा. शेडगे वस्ती, वाकड) याला अटक करुन 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | seven pistols and nine live cartridges seized in three police operations so shackles to three people

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यात गुंडांचा उच्छाद सुरुच, येरवडा परिसरात टोळक्यांमध्ये राडा; बिअरच्या बाटल्या घरावर फेकत, कोयते हवेत फिरवून पसरवली दहशत

Pune PMC News | रस्त्यांच्या नियोजनबद्ध कामांसाठी महापालिका घेणार ‘डिजिटायजेशन’ ची मदत

Maharashtra Police Recruitment | SRPF गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती ! लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

 

Related Posts