IMPIMP

Mumbai Crime | ACP दिपक फटांगरे आणि IPS देवेन भारती यांच्यावर FIR; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Maharashtra Police | threat from ips deven bharti for me and my family provide police protection Retired Police Inspector Deepak Kurulkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Crime | घुसखोर बांग्लादेशी महिलेला अनधिकृतपणे भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट (Passport) बनवून देण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षक दिपक कुरुळकर (Retired Police Inspector Deepak Kurulkar) यांनी तक्रार देऊनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या सहायक पोलीस आयुक्त असलेले दीपक फटांगरे (ACP Deepak Phatangare) आणि तत्कालीन सह पोलीस आयुक्त Joint CP (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती (IPS Deven Bharti) यांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही असा आरोप असून याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययु) ने मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani police station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Mumbai Crime)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

तक्रारदार कुरुळकर यांनी केलेल्या आरोपानुसार, घुसखोर बांग्लादेशी महिला (Bangladeshi woman) आरोपी रेश्मा खान (Reshma Khan) हिने अनधिकृतपणे व योग्य त्या कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करुन इतर साथीदारांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे (Fake documents) तयार करुन भारताचा पासपोर्ट तयार केला. याप्रकरणी कुरुळकर यांनी तक्रार देऊनही आरोपी फटांगरे आणि भारती यांनी तक्रार दाखल केली नाही. तसेच तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (Criminal Intelligence Unit ) चे पोलीस निरीक्षक मिलिंद काठे (Police Inspector Milind Kathe) यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास CIU करीत आहे.

 

 

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1436/2021 हा भारतीय दंडविधान संहिता कलम 465,467,468,471,420 आणि 34 तसेच कलम 12 (1-अ) (ब) भारतीय पारपत्र अधिनियम 1967 सह नियम क्रमांक 3,6 पारपत्र (भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत नियम) 1950, सह कलम 3 परिपत्रकान्वये भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत अधिनियम 1920 सह कलम 3(1) विदेशी नागरीक याबाबतचा अध्यादेश 1948 सह कलम 13,14(अ) आणि (ब) विदेशी नागरीकाबाबत अधिनियम 1946 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 77 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांना मिळू शकते नवीन वर्षात मोठी भेट! सरकार पुन्हा DA मध्ये करू शकते वाढ

Railway Luggage Rules | एक प्रवाशी आपल्यासोबत किती सामान घेऊन जाऊ शकतो? जाणून घ्या

Related Posts