IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 77 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात बरे होणाऱ्या (Recover Patient) आणि बाधित रुग्णांची संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात 77 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 78 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहरात आढळून आलेल्या ओमायक्रॉनचा (Omycron) संसर्ग झालेल्या रुग्णाने कोरोनावर मात केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 500 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 77 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 37 लाख 41 हजार 236 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 07 हजार 493 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 97 हजार 596 रुग्ण बरे झाले आहेत. (Pune Corona)

 

सध्या शहरामध्ये 790 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) असून यामध्ये 79 रुग्ण गंभीर आहेत. तर 50 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. शहरात गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एक आणि शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात 9 हजार 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आधिच्या आजारामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Corona | 77 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांना मिळू शकते नवीन वर्षात मोठी भेट! सरकार पुन्हा DA मध्ये करू शकते वाढ

Railway Luggage Rules | एक प्रवाशी आपल्यासोबत किती सामान घेऊन जाऊ शकतो? जाणून घ्या

Omicron Covid Variant | अखेर ओमायक्रॉनचा धारावीत शिरकाव, आरोग्य यंत्रणा सतर्क; मौलवीचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

 

Related Posts