IMPIMP

Mumbai High Court On Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना उच्च न्यायालयाने फटकारले; म्हणाले – ‘हा कसला सामाजिक न्याय?’

by nagesh
Mumbai High Court On Dhananjay Munde | the bombay hc stayed an order of the states social justice and special assistance minister dhananjay munde shutting down a solapur special kids school

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai High Court On Dhananjay Munde | सोलापुरातील मूकबधिरांची शाळा (School For The Deaf)
बंद करण्यामागे हेतू काय ? तुम्ही कोणता सामाजिक न्याय केलात ? असा सवाल उपस्थित करत मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court)
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना चांगलंच फटकारलं आहे. त्याचबरोबर मुक बधिरांची
शाळा बंद करण्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. (Mumbai High Court On Dhananjay Munde)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ऑक्टोबर 2003 साली जय भवानी संस्थेकडून मूकबधिरांची शाळा चालवण्यात येत होती. त्यावेळी जवळपास 50 विद्यार्थी शिक्षण घेत होते. या शाळेला 29 मे 1999 कलम 1995 अंतर्गत रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रही मिळाले होते. मात्र, ऑक्टोबर 2019 रोजी अचानक रात्री 8 वाजता शाळेच्या तपासणीसाठी आयुक्त आले. त्यानंतर जून 2020 मध्ये शाळेचे रजिस्ट्रेशन काढून घेण्यात आले. संस्थेला एकदाही आपले म्हणणे मांडायचा वेळ देण्यात आला नाही, असं न्यायालयात (Bombay High Court) दाखल केलेल्या याचिकेत सांगितलं. (Mumbai High Court On Dhananjay Munde)

दरम्यान, आयुक्तांनी या शाळेमध्ये 2020 – 21 या वर्षासाठी विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश न घेण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर आता जे मुले शाळेत आहेत त्यांना जवळच्या शाळेत पाठवण्यात येईल याबाबत आदेश दिला. त्यानंतर याबाबत संस्थेकडून 7 जुलै 2020 मध्ये मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर 17 जून 2020 मध्ये धनंजय मुंडे यांनी या संस्थेसोबत ऑनलाइन बोलणी केली. पण काहीही तोडगा निकाली काढला नाही. 27 डिसेंबर 2021 साली जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा परिषदेने शाळा काळ्या यादीत टाकण्याबाबत आयुक्तांना पत्र लिहलं होतं.

यानंतर या निर्णयाविरोधात संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. “शाळेचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा निर्णय कोणाचा होता ?’, असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलांना केला होता. त्यावर त्यांनी हा निर्णय मंत्र्यांनी घेतला होता. असं उत्तर देताच असे निर्णय मंत्रीच घेऊ शकतात, अशी टिप्पणी करत न्यायाधीश मिलिंद जाधव (Judge Milind Jadhav) यांनी सरकारला फटकारले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“त्याचबरोबर शाळा बंद करण्यामागे तर्क काय ? शाळेचे आभार मानण्याऐवजी तुम्ही शाळेचे रजिस्ट्रेशन रद्द करता.
हा कसला सामाजिक न्याय ?,’ असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर सरकारने या प्रकरणी योग्य उत्तर द्यावे, असा आदेश देखील न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी 6 आठवड्यांनी होणार असल्याचं सांगितलं आहे.

Web Title :- Mumbai High Court On Dhananjay Munde | the bombay hc stayed an order of the states social justice and special assistance minister dhananjay munde shutting down a solapur special kids school

हे देखील वाचा :

PMJJBY And PMSBY | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका ! PMJJBY आणि PMSBY च्या प्रीमियमची रक्कम वाढवली, 7 वर्षातील पहिली वाढ

Pune PMC Property Tax | मिळकत करातून पुणे महापालिका मालामाल ! पहिल्या दोन महिन्यात जामा झाले तब्बल 939 कोटी

ED Summons Congress Chief Sonia Gandhi, Rahul In Money Laundering Case | ‘या’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचं समन्स

Related Posts