IMPIMP

PMJJBY And PMSBY | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका ! PMJJBY आणि PMSBY च्या प्रीमियमची रक्कम वाढवली, 7 वर्षातील पहिली वाढ

by nagesh
Assembly Elections 2022-2023 | elections in 11 states in 2022 23 modis mission to win elections

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPMJJBY And PMSBY | पीएमजेजेबीवायचा Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) प्रीमियम दर
प्रतिदिन रु.1.25 इतका वाढवला आहे.
अशाप्रकारे तो वार्षिक 330 रुपयांवरून वाढवून 436 रुपये करण्यात आला आहे.
त्याच वेळी, PMSBY साठी वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे.
नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू होणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशा प्रकारे PMJJBY चा प्रीमियम 32 टक्के आहे आणि Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) चा प्रीमियम 67 टक्क्यांनी वाढला आहे.
या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या दाव्यांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.

 

PMSBY लाँच झाल्यापासून 31 मार्च 2022 पर्यंत प्रीमियम म्हणून 1,134 कोटी रुपये जमा झाले आहेत आणि 2,513 कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले आहेत.
याशिवाय, PMJJBY अंतर्गत प्रीमियम म्हणून 9,737 कोटी रुपये जमा करण्यात आले आणि 14,144 कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले.

 

सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला संपूर्ण विमाधारक समाज बनविण्याच्या विचारातून पुढील पाच वर्षांत PMJJBY अंतर्गत कव्हरेज 6.4 कोटींवरून 15 कोटी आणि PMSBY अंतर्गत कव्हरेज 22 कोटींवरून 37 कोटींपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4 लाखांपर्यंत विमा संरक्षण :
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीएमजेजेबीवाय खाते असलेल्या 18 – 50 वयोगटातील व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण मिळते.
दुसरीकडे, PMSBY मध्ये 18 – 70 वयोगटातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू किंवा एकूण कायमचे अपंगत्व यासाठी रु. 2 लाख आणि आंशिक अपंगत्वासाठी 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

 

Web Title :-  modi government increased the premium of major insurance schemes pmjjby pmsby

 

हे देखील वाचा :

Pune PMC Property Tax | मिळकत करातून पुणे महापालिका मालामाल ! पहिल्या दोन महिन्यात जामा झाले तब्बल 939 कोटी

Sangli Crime News | बनावट नोटा छापून वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 8 लाखाच्या नोटा जप्त

ED Summons Congress Chief Sonia Gandhi, Rahul In Money Laundering Case | ‘या’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचं समन्स

 

Related Posts