IMPIMP

Mumbai Mantralaya News | पोलीस पत्नीचा आवाज सरकारपर्यंत पोहोचलाच नाही; मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

by nagesh
 Mumbai Mantralaya News | police wife sangeet davre died who attempted suicide mantralaya pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Mumbai Mantralaya News | मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न (Attempt Suicide) करणाऱ्या पोलीस पत्नी (Police Wife) संगीता डावरे (Sangeeta Davre) यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. त्यांच्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचार सुरु हेते. संगीता यांचे पती मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात कार्यरत असताना त्यांचा अपघात (Accident) झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याचा आरोप संगीता डावरे यांनी केला होता. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई करा, अशी तक्रार त्यांनी केली होती. परंतु यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी थेट मंत्रालयासमोर (Mumbai Mantralaya News) विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संगीता डावरे यांचे पती हनुमंत डवरे (Hanumant Davare) हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. पामबीच मार्गावर नाकाबंदी करत असताना एका भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा गाडीने थेट बॅरिगेट्स तोडले होते. याच गाडीखाली संगीता यांचे पती चिरडले होते. त्यात त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. कार चालकाने त्यावेळी मद्यप्राशन केले होते. त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, कारचालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. (Mumbai Mantralaya News)

 

अपघातास कारण ठरलेल्या वाहन चालकावर कारवाई व्हावी अशी संगीता यांची मागणी होती. मात्र, अनेक बडे अधिकारी आणि पुढाऱ्यांना भेटूनही त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई झाली नाही. वाहन चालकावर कारवाई करण्याऐवजी त्याला नेरुळ पोलिसांनी (Nerul Police) सोडून दिले. त्यामुळे संगीता डवरे हताश झाल्या होत्या. पती काम करत असलेल्या पोलीस विभागाकडूनच न्याय मिळत नाही हे पाहून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. संगीता यांनी दिलल्या इशाऱ्यालाही सरकारने गंभीर्याने घेतले नाही. त्यामुळे त्यांनी मंत्रालयासमोर विशप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 

अपघातातून संगीता यांचे पती अद्याप सावरले नाही. हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने आणि योग्य उपचार
न झाल्याने अपघात होऊन वर्ष उलटल्यानंतरही त्यांना चालता येत नाही.
तसेच आजपर्यंत त्यांच्या उपचाराचे पैसे देखील त्यांनीच दिले आहेत.
बिलाची फाईल अजूनही पोलीस दलाने (Maharashtra Police) मंजूर केली नसल्याचा आरोप संगीता यांनी केला आहे.
त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. इशारा देऊनही गांभीर्य लक्षात न घेतल्याने आज संगीता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांच्या पत्नीलाच न्याय मिळाला नसल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mumbai Mantralaya News | police wife sangeet davre died who attempted suicide mantralaya pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Police Inspector Transfer | लष्कर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची बदली

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ स्वीकारणार काश्मीरमधील दहशतवादग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व; पुनीत बालन यांची घोषणा

Desai Trophy | एच व्ही देसाई महाविद्यालयाने पटकावली देसाई करंडकची ‘चॅम्पियन ट्रॉफी’

 

Related Posts