IMPIMP

Murder In Miraj | मिरजमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत पैलवानाचा खून

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

मिरज : सरकारसत्ता ऑनलाईन – Murder In Miraj | सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथे सोमवारी मध्यरात्री एका पैलवान तरूणाचा धारदार शस्त्राने डोक्यात आणि पाठीत वार करून खून करण्यात आला आहे. घटनेने मिरज तालुका हादरला आहे. (Murder In Miraj)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आकाश माणिक नरूटे (वय 22) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. पूर्ववैमन्यस्यातून हा खून केला गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Murder In Miraj)

 

सोनी गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. आकाश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता.
तो राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचारात गुंतला होता. सोमवारी रात्री आकाशला दोघांनी दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाशचा फोन बंद लागल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. यानंतर रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर असलेल्या इंग्लिश शाळेच्या मैदानावर आकाशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. आकाशच्या डोक्यात आणि पाठीवर धारदार हत्याराने वार केले होते. (Miraj Crime News)

 

शेतकरी कुटुंबातील आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसांपूर्वी गावातील काही तरूणांशी वाद झाले होते.
त्यातूनच आकाशची हत्या करण्यात आली असा संशय पोलीस आणि नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सोनी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे दिनकर पाटील आणि
भाजपचे राजू माळी यांच्यात लढत आहे. आकाश दिनकर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Murder In Miraj | akash narute wrestler murder gram panchayat election miraj sangli crime news

 

हे देखील वाचा :

Khandala Ghat Accident-Anda Point | सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात होऊन 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू; खंडाळा घाटातील घटना

Ajit Pawar | मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालवाधी 3 आठवडे करा; अजित पवारांची मागणी

Prashant Damle | प्रशांत दामलेंची औरंगाबादच्या रस्त्यांवर टीका; ‘ती’ पोस्ट चर्चेत

 

Related Posts