IMPIMP

Khandala Ghat Accident-Anda Point | सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात होऊन 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू; खंडाळा घाटातील घटना

by nagesh
Khandala Ghat Accident-Anda Point | excursion bus accident at khandala ghat two students killed incident near anda point pune lonavala accident news

लोणावळा : सरकारसत्ता ऑनलाईन  – Khandala Ghat Accident-Anda Point | खंडाळ्याजवळ मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर अंडा पाॅइंट येथे एका बसचा अपघात झाला. या बसमध्ये एका खासगी क्लासचे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. मात्र दुर्दैवाने ती बस पलटी झाली. त्यामुळे या बसमध्ये असलेल्या ४८ विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास झाली. (Khandala Ghat Accident-Anda Point)

 

रायगड जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ विद्यार्थी जखमी झाले आहेत.
या जखमींपैकी ११ जण गंभीररित्या जखमी आहेत.
अपघातामधील जखमींना खोपोली, पनवेल भागातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
चेंबूर येथील मयांक या एका खासगी क्लासचे विद्यार्थी बस क्रमांक एमएच ०४ जीपी २२०४ मधून लोणावळ्यातील वेट अँड जाॅय वॉटर पार्कमध्ये आले होते. मात्र, परतीच्या प्रवासात खंडाळा घाटातील वळणावर बसचा ब्रेक निकामी झाला त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट आणि खंडाळा महामार्ग पोलिस आणि ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’
या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते इतर यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर बचाव कार्य सुरु झाले आणि जखमी मुलांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मृत्यू झालेल्यांपैकी एक मुलगा व एका मुलीचा समावेश आहे.

 

Web Title :- Khandala Ghat Accident-Anda Point | excursion bus accident at khandala ghat two students killed incident near anda point pune lonavala accident news

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालवाधी 3 आठवडे करा; अजित पवारांची मागणी

NCP MLA Rohit Pawar In Belgaum | ‘जे शरद पवार म्हणाले होते, ते रोहित पवार यांनी करून दाखवले’; सर्वांना चकित करत बेळगावात दाखल

IND vs BAN Test | भारताचे ‘हे’ 3 खेळाडू रचू शकतात इतिहास; व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजाराही समावेश

 

Related Posts