IMPIMP

Nana Patole | पंजाबच्या घटनेमागे HM अमित शहांचा तर हात नाही ना ? पटोले यांचा गंभीर आरोप

by nagesh
Nana Patole | nana patole reaction on pm narendra modi mumbai visit

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनपंजाबच्या (Punjab) दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ताफा अडवण्यात आल्यानं भाजपनं (BJP) काँग्रेस विरोधात रान उठवलं आहे. या प्रकरणावरुन दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्यावरुन वादंग निर्माण झाले असताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अमित शाह (HM Amit Shah) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात नाही ना ? असा गंभीर आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वी
पासून सर्व सुरक्षा व्यवस्था (Security Arrangement) पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी (SPG) या सर्वांच
कंट्रोल करत असतात. एसपीडी (SDP) गृहखात्यांतर्गत येतात. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहा यांचा तर हात
नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच याचे उत्तर दिले पाहिजे, असे करुन डाव साधायचा तर नव्हता ना हे देखील त्यांनी सांगितले पाहिजे, अशी
शंका पटोले यांनी उपस्थित केली आहे.

 

 

पंतप्रधान रोज अनेक रुपं बदलतात

नाना पटोले पुढे म्हणाले, पाच राज्यातील निवडणुका (Election) जिंकण्यासाठी ही नौटंकी सुरु आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी जनतेचे
प्रश्न यावरील विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीने काम करत आहे. पंतप्रधान रोज अनेक रुपं बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केलं.
पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरु असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरु केली आहे. त्यातून
दूध का दूध पानी का पानी व्हावं असेही पटोले यांनी म्हटले आहे.

 

 

चंद्रकांत पाटलांचा पलटवार

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोले यांना कधी कोणी
सीरिअसली घेत नाही. ते राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांचं ऐकतो. पण एरव्ही ते कधीच सीरिअस नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी
सीरिअसली पाहात नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Nana Patole | is amit shah behind pm modi s security breach in punjab says nana patole

 

हे देखील वाचा :

LIC Jeevan Pragati Plan | दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाख रुपयांचा मोठा फंड, जाणून घ्या सविस्तर

Common KYC | कॉमन KYC म्हणजे काय? सरकारच्या दृष्टीने का आणि कसे फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी? जाणून घ्या

Green Vegetables | लहानमुले असो किंवा मोठे माणसे हिरव्या पालेभाज्या खाण्यास करतात टाळाटाळ, तर ‘या’ पध्दतीनं करायला लावा सेवन, जाणून घ्या

 

Related Posts