IMPIMP

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

by nagesh
Nanded to Pune Railway | good news for train passengers nanded hadapsar train will now run daily to pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी (Train Passengers) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठवड्यातून दोन वेळा धावणारी नांदेड-हडपसर (Nanded-Hadapsar Railway) रेल्वे आता दररोज नांदेड ते पुणे (Nanded to Pune Railway) धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून (Central Railway Administration) दिली आहे. ही गाडी 5 जुलै 2022 रोजी पासून दररोज धावणार आहे. या गाडीच्या नंबरमध्येही बदल करण्यात आले असून नवीन नंबर 17630 आणि 17629 असणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या (Railway Public Relations Department) माहितीनुसार, नांदेडसह मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे मंत्रालयातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्यातून पुण्याला येण्यासाठी ही रेल्वे अत्यंत सोयीची ठरणार आहे. या रेल्वेला तेरा डबे असणार आहेत. यामध्ये वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे 4 डबे, 5 स्लीपर आणि 2 जनरल श्रेणीतील डबे असणार आहेत. (Nanded to Pune Railway)

 

 

रेल्वेचा मार्ग आणि वेळ –
नांदेड-पुणे एक्सप्रेस (17630) : ही रेल्वे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दररोज दुपारी 3.15 वाजता सुटेल.
पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी 5.30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

पुुणे-नांदेड एक्सप्रेस (176329) : ही रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री 9.30 वाजता सुटेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी 10.15 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nanded to Pune Railway | good news for train passengers nanded hadapsar train will now run daily to pune

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’ – एकनाथ खडसे

Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्‍या वाहनचालकांसाठी खूशखबर ! रजपूत वसाहतीतील रस्त्याचे रुंदीकरण होणार; वसाहतीतील 33 घरांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

 

Related Posts