IMPIMP

Sara Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरच्या मुलीकडून ‘या’ क्रिकेटरचं कौतुक, सोशल मीडियावर पोस्ट केलं त्याचं पोस्टर

by nagesh
Sara Sachin Tendulkar | sara sachin tendulkar likely to debut bollywood soon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनक्रिकेटर (Cricketer), मास्टर ब्लास्टर (Master Blaster) आणि भारतरत्न (Bharat Ratna) अशी ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सारा तेंडुलकरचे (Sara Sachin Tendulkar) लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टची तितकीच मोठी चर्चाही होऊ लागली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सारा तेंडुलकरच्या (Sara Sachin Tendulkar) एकंदर पोस्ट पाहता ती कला जगतामध्ये पदार्पण करणार का, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. यात भर म्हणजे साराचे एका क्रिकेटपटूशी जोडलं गेलेलं तिचं नाव. आयपीएलच्या (IPL) नव्या पर्वासाठी खेळाडूंवर बोली लागत असतानासुद्धा सारा कोणाला पाठींबा देते आणि कोणत्या यशानं आनंदी होते, यावर देखील तिच्या फॉलअर्शचं लक्ष होतं.

 

अखेर तो क्षण आलाच, ज्यावेळी साराने मुंबई संघात Mumbai Indians (MI) निवड झाल्यामुळे एका खेळाडूला शुभेच्छा दिल्या. या खेळाडूचं अनेकांकडून कौतुक होत असताना त्याचा फोटो असणारं एक पोस्टर तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलं आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर (Arjun Sachin Tendulkar) आहे. 2008 पासून मुंबई संघाचा चाहता असणारा अर्जुन आता मुंबई संघाचा एक भाग आहे.

 

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघाने विश्वास दाखवला आहे.
नीता अंबानीच्या (Nita Ambani) संघाने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावात ज्युनिअर तेंडुलकरला (Junior Tendulkar) 30 लाख रुपयांच्या किमतीला आपल्या संघात घेतले आहे.
याआधीच्या हंगामात मुंबईने अर्जुनला 20 लाखांच्या बेस प्राइजवर खरेदी केले होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अर्जुनला मुंबई संघाने आपल्या संघात घेतल्यानंतर साराने अर्जुनचा (Sara-Arjun) एक फोटो शेअर केला आहे.
त्यावर बोली लागलेला 30 लाख रुपयांचा आकडा असं एकंदर हे चित्र आहे.
तेंडुलकर कुटुंबासाठी अर्थातच ही बाब सुखावणारी असणार यामध्ये शंका नाही.
त्यातही सचिनचा मुलगा असल्यामुळे क्रीडारसिकांच्या त्याच्याकडून काही अपेक्षाही आहेत.
आता तो या अपेक्षा आणि बहिणीला वाटणारा अभिमान सार्थ ठरवतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Sara Sachin Tendulkar | sachin tendulkar daughter sara tendulkar reacts after brother arjun tendulkar selected for mumbai indians ipl 2022

 

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stock | 1 रुपयापेक्षा सुद्धा कमी होता भाव, वर्षभरात ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या

Mumbai High Court On Sameer Wankhede | वानखेडेंची याचिका तात्काळ सुनावणीस आल्याने हायकोर्ट संतप्त

Multibagger Stocks | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकवर खेळू शकता डाव, पुढील 6 महिन्यात पोहचू शकतो 3,000 रुपयांच्या पुढे; एक्सपर्ट आहेत बुलिश

 

Related Posts