IMPIMP

Narayan Rane | ‘…म्हणून शिवसेनेने गद्दारी केली’, नारायण राणेंचा सेनेवर जोरदार ‘प्रहार’

by nagesh
Narayan Rane | breaks alliance to get cm post bjp leader and union minister narayan rane criticizes shiv sena at nashik

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइनआता खुर्ची हलायला लागली आहे, आम्ही आहोतच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजपसोबत (BJP) युती (Alliance) करुन शिवसेना (Shivsena) निवडून आली. पण मुख्यमंत्रीपद (CM) भाजपला मिळतंय म्हणून गद्दारी केली, अशी जळजळीत टीका भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्याहस्ते नाशिक येथील IT कॉन्क्लेव्ह 2022 (IT Conclave 2022 Nashik) चं उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नाशिक शहरातील (Nashik City) आडगाव शिवारात 335 एकरमध्ये आयटी पार्क (IT Park) सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानपानाचे नाट्य पहायला मिळाले. महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni), माजी मंत्री जयकुमार रावळ (Former Minister Jayakumar Rawal), आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) हे उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात आयोजक असूनही पालिका प्रशासनाची अनुपस्थिती होती. पालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यावेळी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्लाबोल केला.

 

नुसत्या घोषणा, काही दम नाही

नारायण राणे म्हणाले, कोकणात (Konkan) नाणार भागातील सर्व जमिनी शिवसेना नेत्यांच्या आहेत. अणुऊर्जा प्रकल्पात (Nuclear Power Project) या जमिनी देतील आणि पैसे कमावतील. नुसत्या घोषणा देतात, काही दम नाही यांच्यात. मी उभा राहिलो आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं मोजणी करुन घेतली. जिथे तिथे विरोध करत आहेत. नाशिकमध्ये मी येणार म्हणून विरोध केला. मात्र एकही शिवसैनिक समोर येत नाही, विरोध विकासाला नको. तामिळनाडू (Tamil Nadu), गुजरात (Gujarat), केरळ (Kerala), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पुढे जात आहे आणि महाराष्ट्र मागे पडत असल्याची टीका त्यांनी केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आता खुर्ची हलायला लागली

ते पुढे म्हणाले, 1991 पासून मला प्रोटेक्शन आहे, मी कुणाला घाबरत नाही. पेपर कटरनं हल्ला केला बदला म्हणून नितेशवर हल्ला केला. पण आता खुर्ची हलायला लागली आहे. आम्ही आहोतच. भाजपसोबत युती करुन शिवसेना निवडून आली. पण मुख्यमंत्रिपद भाजपला मिळतंय म्हणून गद्दारी केली. पंतप्रधानांवर (PM) आरोप करायची लायकी नाही, पात्रता नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, अशी टीका राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केली.

 

पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे हे मुख्यमंत्री

राज्याच्या प्रगतीवर बोला, विकास, शिक्षण हे विषय नाही, मुंबईत मराठी माणसांची घरं गेली,
तिथे झालेल्या इमारतीत हे पार्टनर आहेत. अडीच वर्षे मुख्यमंत्री हे पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे आहे.
अनेक मंत्री जेलमध्ये जायच्या वाटेवर आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती चेअरमनची मोजणी 100 कोटीवर गेली, असा टोला त्यांनी लगावला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कमिशनर पळून गेले

नाशिकमधील आयटी पार्कचा हा प्रस्ताव एक महिन्यापूर्वी आला.
नाशिकमध्ये राजकारण जास्त खेळलं जातंय.
आपल्याला राजकारण खेळायचं नाही तर आयटी पार्क उभं करायचंय.
परंतु उद्योग कष्टातून उभा राहतो. आत्मनिर्भर होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.
कमिशनर (पालिका आयुक्त) पळून गेले.
मी केंद्रीय मंत्री, कार्यक्रमात असताना आयुक्तांनी यायलाच हवं, अशी टीका राणे यांनी केली.

 

Web Title :- Narayan Rane | breaks alliance to get cm post bjp leader and union minister narayan rane criticizes shiv sena at nashik

 

हे देखील वाचा :

Nilesh Rane On Nawab Malik | ‘दाऊदचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात’; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Protein Rich Fruits | पोलादी बॉडीसाठी चिकन-अंडी नव्हे, खा ‘ही’ 5 स्वस्त फळे, शरीराला मिळेल पूर्ण प्रोटीन

Esha Gupta Superbold Look | सुपरबोल्ड इशा गुप्तानं खुर्चीवर बसून उघडलं कोटचं बटनं, पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts