IMPIMP

Narhari Zirwal | ‘आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, आमदारांना…’, कोर्टाच्या निकालाआधीच झिरवळ यांचं मोठं विधान

by nagesh
Narhari Zirwal | "Let the case of disqualification of MLAs come to me, MLAs...", Jhirwal's big statement before the court verdict.

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाईन- राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) 10 मे नंतर म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर (Karnataka Assembly Elections) निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हा निकाल येण्यापूर्वीच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी मोठं विधान केलं आहे. माझ्याकडे त्या आमदारांचं प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच (MLA Unqualified) करेन, असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे. झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या या विधानामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

 

नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना तुमच्याकडे आमदारांचं प्रकरण आलं तर काय करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन. विरोधात निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असं होईल. मी घटनेला (Constitution) धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली अस म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय योग्य असल्याचा दावा नरहरी झिरवळ यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे उत्तराधिकारी निर्माण करण्यात अपयशी ठरले,
अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले,
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर या घटनेचे प्रत्येकाने आपापल्यापरीने अंदाज बांधले.
राजकीय पातळीवर आणि माध्यमांनी देखील यातून अनेक अर्थ काढले.
त्यानुसार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अर्थ काढला असेल, अशी टीका झिरवळ यांनी केली.

 

Web Title :- Narhari Zirwal | “Let the case of disqualification of MLAs come to me, MLAs…”, Jhirwal’s big statement before the court verdict.

 

हे देखील वाचा :

Nana Patole | मविआच्या जागा वाटपाबाबत नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले-‘मविआमध्ये जागा वाटपाविषयी…’

Abdul Sattar | आमच्या मतावर राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा, संजय राऊतांबद्दल बोलताना सत्तारांची जीभ घसरली

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान

 

Related Posts