IMPIMP

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान

by nagesh
 MLA Shashikant Shinde | 'We want Ajit Pawar to be the Chief Minister, but Sharad Pawar and...', statement of NCP MLA

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे
बॅनर लावण्यात आले होते. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यातच आता आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. कोणाला वाटत नाही, अजित पवार मुख्यमंत्री (Chief Minister) व्हावेत, असं शशिकांत
शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

 

शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde)  पुढे म्हणाले, आम्हाला आमच्या पक्षाचे नेते म्हणून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. त्यांच्यामध्ये ती पात्रता, क्षमता आणि योग्यता आहे. सकाळी सातपासून शरद पवार (Sharad Pawar) यांच्याप्रमाणे ते काम करतात. राज्यातील प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि अभ्यास असलेला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांची इच्छा आहे. पण, शरद पवार आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) याबाबत निर्णय घेतील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तर येणारा मुख्यमंत्री तिन्ही पक्षातून एक असेल. त्यामध्ये अजित पवार यांना संधी मिळाली तर महाविकास आघाडी अधीक भक्कम होईल, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. शरद पवार आणि अजित पवार यांचे सातारा जिल्ह्यासाठी खूप मोठे योगदान आहे.
रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha), मेडिकल कॉलेज (Medical College)
आणि इतर विविध विकासाला अजित पवारांचे योगदान असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Shinde Group MLA Mahesh Shinde) यांच्यावर टीका केली.
शिंदे गटातील आमदारांचा बाजार समितीच्या निवडणुकीत (Market Committee Election) बहुतेक ठिकाणी पराभव झाला आहे.
या पराभवाचं विश्लेषण म्हणजे जनतेत त्यांच्याबद्दल असलेली नाराजी. कोरेगाव यालाही अपवाद नाही.
तेथील आमदार स्वत: मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी महेश शिंदे यांच्यावर केली.

 

Web Title :- MLA Shashikant Shinde | ‘We want Ajit Pawar to be the Chief Minister, but Sharad Pawar and…’, statement of NCP MLA

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘शरद पवारांचं राजीनामानाट्य म्हणजे तमाशातील वगनाट्य!’ चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात (व्हिडिओ)

MNS Chief Raj Thackeray | कर्नाटकात कोणाला मतदान करायचं? राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन

IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne | आयपीएस अधिकारी महेश पाटील यांची ठाण्यात तर पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांची बुलढाणा येथे बदली

 

Related Posts