IMPIMP

Abdul Sattar | आमच्या मतावर राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा, संजय राऊतांबद्दल बोलताना सत्तारांची जीभ घसरली

by nagesh
 Abdul Sattar | Sattar's tongue slipped while talking about Sanjay Raut, the giant dog who went to the Rajya Sabha on our vote

छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – संजय राऊतांवर टीका करताना कृषीमंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची जीभ घसरली. त्यांनी राऊतांची तुलना थेट कुत्र्याशी केली आहे. ज्या कुत्र्याला आम्ही आमच्या मतांवर राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवलं आणि त्यानंतर तो आम्हाला कुत्रा म्हणत असेल तर त्याच्यासारखा महाकुत्रा कोणताच नसेल, अशी घणाघाती टीका अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) आणि अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

 

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, आम्हीच त्यांना राज्यसभेवर पाठवलं. कुत्र्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. रोज सकाळी उठतो आणि भुंकतो. त्यांच्यापेक्षाही वाईट आम्हाला बोलता येतं. आमच्याच मतावर ते राज्यसभेवर गेले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा (Resignation) द्यावा, त्यांनी दिला तर मी पण राजीनामा देतो, असं खुलं आव्हान अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा देऊन निवडून यावं मी आव्हान करतो आणि मी पण राजीनामा देतो,
त्यावेळेस लोकांना कळेल तो कोणाची अवलाद आहे माणसाची की कुत्र्याची,
अशा पद्धतीने बोलणाऱ्या माणसाने थोडा तरी जिभेला लगाम लावून बोलावं,
अशा शब्दात सत्तार यांनी राऊतांवर पलटवार केला. सत्तारांच्या टीकेला राऊत कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title :- Abdul Sattar | Sattar’s tongue slipped while talking about Sanjay Raut, the giant dog who went to the Rajya Sabha on our vote

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, नाना पटोलेंचाही राऊतांवर हल्लाबोल

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान

MNS Chief Raj Thackeray | कर्नाटकात कोणाला मतदान करायचं? राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन

 

Related Posts