IMPIMP

Nashik Aurangabad Road Accident | दुर्दैवी ! लक्झरी बसची ट्रकला धडक, अपघातात 11 प्रवाशांचा होरळपून मृत्यु; 38 जण जखमी

by nagesh
Nashik Aurangabad Road Accident | Accident On Nashik Aurangabad Road 11 died and 38 injured

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – Nashik Aurangabad Road Accident | औरंगाबाद रोडवरील हॉटेल रिची चौकात असलेल्या चौफुल्यावर लक्झरी बस आणि टँकर चा शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजता  भीषण अपघात झाला. बसने ट्रकच्या डिझेल टाकीला धडक दिल्याने त्यातील डिझेल उडून संपूर्ण बसने पेट घेतला. त्यात बसमधील ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यु झाला. यवतमाळ येथून ही बस मुंबईकडे जात होती. मृत्यु पावलेल्यांमध्ये प्रामुख्याने पुरुष असून एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातातील जखमीमध्ये १९ पुरुष, ८ स्त्रीया, एक लहान मुलगा व एक लहान मुलगी यांचा समावेश आहे. स्लीपर कोच असल्याने बस पूर्णपणे बंद होती. त्यात प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे बसने चारी बाजूने पेट घेतल्यानंतरच प्रवाशांना आगीची कल्पना आली व त्यांना बाहेर पडताच आले नाही़ अशा ११ जणांचा आतच होरपळून मृत्यु झाला. (Nashik Aurangabad Road Accident)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यवतमाळमधील पुसदहून चिंतामणी ट्रॅव्हलची (Chintamani Travels) ही बस काल रात्री निघाली होती. सर्व प्रवासी पहाटे सव्वा पाच वाजता हॉटेल रिची चौकात लक्झरी बसने भाजीपाला घेऊन जाणार्‍या ट्रकला मधोमध धडक दिली. ही धडक नेमकी ट्रकच्या डिझेल टँकला बसली. त्यात डिझेल टँकमधील डिझेल बसवर उडाले. त्यामुळे बसने पेट घेतला. अपघातानंतर बस ५० ते ६० फुट पुढे घसरत गेली तर ट्रक सुमारे ८० मीटर पुढे जाऊन थांबला. (Nashik Aurangabad Road Accident)

 

अपघातानंतर रस्त्याने जाणार्‍या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत जाऊन माहिती दिली.
या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने बसची आग काही वेळातच विझवली.
मात्र, तो पर्यंत बस पूर्णपणे जळली. आग विझविल्यानंतर आत जाऊन पाहिल्यावर बसमध्ये ११ जणांचे मृतदेह आढळून आले.
आग लागल्याचे समजताच अनेक प्रवाशांनी बसमधून उड्या मारुन आपली सुटका करुन घेतली.
या आगीत अनेक जण भाजुन जखमी झाले आहे. शासकीय रुग्णालयात ३८ जणांवर उपचार करण्यात येत आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे़ शिंदे हे स्वत: नाशिकला जाणार असून घटनास्थळाला भेट देणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nashik Aurangabad Road Accident | Accident On Nashik Aurangabad Road 11 died and 38 injured

 

हे देखील वाचा :

Ramdas Kadam | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गट काय करणार? रामदास कदम म्हणाले, ‘यांना माहिती नाही की…’

IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुल्का यांना क्लिन चिट मिळणार?

Womens Asia Cup | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने केलेल्या ‘या’ चुकीमुळे भारताला गमवावा लागला सामना

 

Related Posts