IMPIMP

Ramdas Kadam | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गट काय करणार? रामदास कदम म्हणाले, ‘यांना माहिती नाही की…’

by nagesh
Ramdas Kadam | shivsena eknath shinde faction leader ramdas kadam using abusive word for anil parab at khed ratnagiri press conference

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ramdas Kadam | धनुष्यबाण चिन्ह (Dhanushaban Symbol) कोणाचे यावरून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) संघर्ष सुरू आहे. सध्या हा वाद निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. शिंदे आणि ठाकरे गट (Thackeray Group) आपआपले पुरावे मांडतील, त्यानंतर निवडणूक आयोग निर्णय देईल. परंतु, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवल्यास काय करणार? यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेताना एक आमदार निवडून यायला तीन-तीन लाख मतदान असते आणि एक खासदार निवडून आणण्यासाठी 20 लाखांचे मतदान असते याचाही विचार करेल. कदम एका मराठी वृतवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रामदास कदम म्हणाले, निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही त्याचे स्वागत करू. तसेच एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. मात्र, आम्हाला 100 टक्के विश्वास आहे की, धनुष्यबाण निश्चितपणे आम्हाला मिळेल. पूर्ण बहुमत आमच्याकडेच आहे. याआधीचे निवडणूक आयोगाचे निकाल पाहिले तर ज्याच्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक, सभापतीचे बहुमत आहे त्यांच्याच बाजूने निकाल आला आहे.

 

रामदास कदम (Ramdas Kadam) पुढे म्हणाले की, दसरा मेळाव्याला (Dasra Melava 2022)
शिवाजी पार्क (Shivaji Park) आणि बीकेसी येथेही अधिक ताकद कुणाकडे आहे हे सिद्ध झाले आहे.
लोकशाहीत ज्याच्याकडे जास्त संख्या त्यांना जास्त महत्व आहे.
कदम म्हणाले, आमची शिवसेना (Shivsena) ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
यांच्या विचाराची असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धनुष्यबाण आम्हालाच मिळेल.
दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार नाही.

 

Web Title :- Ramdas Kadam | ramdas kadam comment on what if election commission freeze shivsena symbol

 

हे देखील वाचा :

IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुल्का यांना क्लिन चिट मिळणार?

Womens Asia Cup | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने केलेल्या ‘या’ चुकीमुळे भारताला गमवावा लागला सामना
Deepak Kesarkar | टीईटी घोटाळ्यातील दोषी शिक्षकांसंदर्भात दीपक केसरकर यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

Wrestler Sarah Lee Passed Away | WWE स्टार सारा ली चे वयाच्या 30 व्या वर्षी निधन

 

Related Posts