IMPIMP

Nashik Crime | नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

by nagesh
Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | shinde vs thackeray fight over shivsena political symbol bow and arrow election commission will consider affidavits  number of mla mp adv ujjwal nikam

नाशिक :  सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Crime | नाशिक शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी (Shivsena Worker) निलेश उर्फ बाळा कोकणे
(Nilesh alias Bala Kokane) यांच्यावर सोमवारी (दि.18) रात्री प्राणघातक हल्ला (Attack) झाला आहे. सोमवारी रात्री साडे दहा-पावणे अकरा
वाजेच्या सुमारास बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीवरुन एमजी रोडवरुन (MG Road) जात होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने वार केले. यामुळे कोकणे रक्तबंबाळ झाले. अचानक झालेल्या या हल्ल्याने ते घाबरून गेले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळील (Sarkarwada Police Station) खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. एकीकडे राज्यात शिवसेना (Nashik Shivsena) व शिंदे गट यांच्यात घमासान सुरु असताना नाशिकच्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Nashik Crime)

 

बाळा कोकणे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली (Bhadrakali Police Station), सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. फरार आरोपींचा पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. हा हल्ला नेमका कोणी व का केला, हे अद्याप समजू शकले नाही. या हल्ल्यात कोकणे थोडक्यात बचावले आहेत. (Nashik Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान बाळा कोकणे यांच्यावरील हल्ल्यासह शहरातील इतर राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर शालिमार येथील शिवसेना कार्यालय, खासदार निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच दंगल नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

Web Title :- Nashik Crime | attack on shiv sena leader bala kokane of nashik crime news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लोन अ‍ॅपद्वारे बदनामी करणार्‍यांमध्ये आता आसामाच्या महिला

Devendra Fadnavis | ‘पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करणार’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Political Crisis | ‘नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे 4 तास, पण…’ – एकनाथ खडसे

 

Related Posts