IMPIMP

Devendra Fadnavis | ‘पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करणार’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by nagesh
Winter Session 2022 | devendra fadnavis first comment after lokayukta bill passed in assembly session

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन  Devendra Fadnavis | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. अशातच विदर्भाच्या
(Vidarbha) इतर जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra
Fadnavis) विदर्भ दौ-यावर आहेत. फडणवीस यांनी हिंगणघाट वर्ध्याची पूर (Wardha Flood) परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना
अधिकाधिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

“पूरग्रस्त लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वर्ध्याला पुराचा फटका बसला असून शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आश्वासन दिलं आहे. वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे अनेक गावांना पुरानं वेढलं आहे. देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक इथं सुद्धा पुराच्या पाण्याने शिरकाव केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, अनेक घरात पाणी शिरलं आहे. मागील 10 दिवसात दुसऱ्यांदा गावात पाणी शिरल्यानं नागरिक संकटात सापडले आहेत. नागरिकांकडून आता गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली जाते आहे.

 

विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात पूरस्थिती आहे.
तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये रविवारी पावसाने दिवसभर उसंत घेतल्यानंतर त्याच रात्री मात्र शहराला चांगलंच झोडपलं होतं.
मात्र, सोमवार आणि मंगळवार सकाळपासून पुन्हा थोड्या-थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पावसाची रिपरिप सुरू होती.
दरम्यान, महानगरपालिकेनं नियोजन केलं नसल्यानं शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांत पाणी शिरले आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | vidarbha wardha flood devendra fadnavis will help the rain damaged farmers

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ‘नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे 4 तास, पण…’ – एकनाथ खडसे

Pune Crime | शिवाजीनगर येथे एकाच वेळी 6 ऑनलाईन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापे; 4.55 लाखाचा मुद्देमाल जप्त, 55 जणांवर कारवाई

CM Eknath Shinde | दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला खासदारांचा आकडा; म्हणाले – ’12 नाही आपले तर 18′

 

Related Posts