IMPIMP

Nashik Crime | नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडून पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, तामिळनाडूतील आरोपी गजाआड

by nagesh
Nashik Crime | Fake notes of five lakh seized from idli seller in Nashik, accused from Tamil Nadu arrested

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Crime | बनावट नोटा बाजारात (Fake Notes) चलनात आणताना एका आरोपीला नाशिक शहरातून अटक केली आहे. ही कारवाई शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीतील हॉटेल छानच्या मागे असलेल्या भरतनगर परिसरात करण्यात आली. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 5 लाख 8 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा (Nashik Crime) जप्त केल्या आहेत. आरोपी इडली व्यावसायिक असून त्याच्याकडून 2000 रुपयांच्या 244 नोटा तर 500 रुपयांच्या 40 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update4

 

पोलीस उपायुक्त पौर्णीमा चौगुले (DCP Pournima Chaugule) यांनी सांगितले, नाशिकमध्ये तब्बल पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency) जप्त करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 500 आणि दोन हजार रुपयांच्या 5 लाख 8 हजार किंमतीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून, या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी ही कारवाई केली. (Nashik Crime)

 

मलायारसन मदसमय Malayarasan Madsamay (वय-33 मूळ रा. कायथर पन्नीकार कुलूम, तामिळनाडू)
असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या व्यक्तीवर भारतीय चलनी नोटा नकली तयार करणे आणि
त्या नोटा खरे चलन म्हणून वापरणे याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
काल (गुरुवारी) रात्री भारतनगर परिसरातून पोलिसांनी या संशयित आरोपीला अटक केली.
आरोपीला या नोटा तामिळनाडू मधील मित्राने दिल्याचे आरोपीने सांगितले.
त्याचे आणखी कोणी साथिदार आहेत का, याचा तपास पोलीस करत आहे.
दरम्यान, बनावट नोटा चलनात आणणारी मोठी टोळी शहरात सक्रीय झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nashik Crime | Fake notes of five lakh seized from idli seller in Nashik, accused from Tamil Nadu arrested

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘त्या’ ST कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा ! उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय शिंदे सरकार बदलणार

Dombivli Crime | बँक कर्मचाऱ्यानेच केली बँकेत चोरी, अखेर शेवटी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा पदभार स्वीकारताच धडाका, रुग्णालयात रात्री डॉक्टर नसल्यास थेट निलंबन, धाडसत्र सुरु

 

Related Posts