IMPIMP

Nashik Graduate Constituency | तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोडीनंतर ‘महाविकास’च्या नाशिक पदवीधर मतदार संघातील अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर

by nagesh
Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   नाशिक पदवीधर मतदार (Nashik Graduate Constituency) संघात तांबे पिता-पुत्राकडून करण्यात आलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी समोर मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावर बोलताना आज (दि.१६) काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचे नाव घोषीत केले. एका वृत्तवाहिनीशी ते संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी या नावाची घोषणा केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार आहेत.’ असे म्हणत त्यांनी शुभांगी पाटील यांचे अधिकृतरित्या नाव जाहीर केले.

 

याअगोदर शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले होते की, ‘अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला या माध्यमांनी चालवलेल्या बातम्या आहेत. आमचा अंतिम निर्णय होईल आणि सोमवारी (१६ जानेवारी) नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करू. नागपूरवरही चर्चा होणार आहे. दोन्ही उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढतील.’

 

तसेच यावर पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल
अशी स्थिती आहे. बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपचा चेहरा हा पदवीधरांच्या,
शिक्षकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणूकांमध्ये लोक भाजपला त्यांची जागा दाखवतील.
’ असेही यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान काँग्रेस पक्षाशी बंडखोरी केलेल्या तांबे पिता-पुत्रांचा देखील यावेळी बोलताना नाना पटोले यांनी जोरदार समाचार घेतला. नाना पटोले म्हणाले की, ‘डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती.
त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे.
तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपाचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले.
तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे.’ अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना नाना पटोले यांनी दिली.
(Nashik Graduate Constituency)

 

Web Title :- Nashik Graduate Constituency | nana patole declare name of mva candidate from nashik graduate constituency election

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | बीट मार्शलवर सपासप वार करुन फरार झालेल्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांक़डून अटक

Maharashtra Politics | राज्यातील पाचही विधानपरिषदेच्या मतदारसंघाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट, नाशिकमध्ये तिरंगी लढत; जाणून घ्या पाच ठिकाणी कशी होणार लढत?

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या

 

Related Posts