IMPIMP

Nawab Malik | ‘3 कोटींचे Bitcoin द्या, वडिलांचा जामीन करतो’; नवाब मलिकांच्या मुलाला आलेल्या फोनने खळबळ !

by nagesh
Nawab Malik Health | ncp leader nawab malik serious in hospital says lawyer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनगेल्या तीन आठवड्यांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री (Minister for Minorities) आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) तुरूंगात आहेत. नवाब मलिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. ED चुकीची कारवाई करत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. मात्र अशातच नवाब मलिकांना (Nawab Malik) जामीन हवा असल्यास 3 कोटी रूपये द्या अशी मागणी करण्यात आल्याबाबत मलिकांच्या मुलाने पोलीस स्थानकामध्ये (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नवाब मलिक यांचा मुलगा अमीर मलिक (Amir Malik) यांनी मुंबईतील (Mumbai) विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये (Vinoba Bhave Police Station) तक्रार दाखल केली आहे. इम्तियाज नावाच्या व्यक्तीने मलिक यांच्या जामीनासाठी 3 कोटी रूपयांची मागणी केली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. संबंधित व्यक्तीने ही रक्कम बिटकॉइनच्या (Bitcoin) रूपात मागितली आहे. फोन करणारा व्यक्ती दुबईतून (Dubai) आल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक (Nawab Malik) यांना 23 फेब्रुवारीला अटक झाली होती.
आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नवाब मलिकांची याचिका फेटाळली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, नवाब मलिक यांच्या जामीनासाठी (Bail) कोणी फोन केला याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
पोलीस तपास करत असून उर्वरित माहिती लवकरच समजेल.

 

Web Title :- Nawab Malik | 3 crore rupees demanded for nawab malik bail his son file complaint in mumbai police Vinoba Bhave Police Station

हे देखील वाचा :

NCP Meeting in Mumbai | शरद पवारांनी बोलावली पक्षातील प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक, मुंबईत घडामोडींना वेग

Pune Corporation | रास्ता पेठेतील मंडईचा प्रश्न 11 वर्षानंतर मार्गी ! पुणे महानगरपालिकेने कारवाई करत ताब्यात घेतली जागा

Devendra Fadnavis | ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय होणार आणि एकहाती सत्ता येणारच’

Related Posts