IMPIMP

NCP MLA Amol Mitkari | मुख्यमंत्र्यांनाच वाटत नाही ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर….असे म्हणत अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

by nagesh
NCP MLA Amol Mitkari | ncp mla amol mitkari slams eknath shinde fadnavis goverment

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन   काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोकण महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ असा केला होता. तेव्हा उपस्थितांमध्ये हसू पसरले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची एकनाथ शिंदेंना लागलेली सवय अजून गेलेली नसावी असा अनेकांचा अंदाज होता. पण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांचे याबद्दल वेगळे मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ते मुख्यमंत्री आहेत म्हणून वाटत नाहीत, अशी टीका अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी केली आहे.

 

सोलापुरातील एका शेतकरी मेळाव्यात अमोल मिटकरी बोलत होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला, पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. मिटकरी म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकलं का? त्या भाषणात ते म्हणतात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. मुख्यमंत्र्यांनाच वाटत नसेल की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर कसं करायचं?

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिटकरींनी नरेंद्र मोदींची नक्कल केली. “मेरे प्यारे भाई और बहनो” हा अमीन सयानींचा शब्द नरेंद्र मोदींनी चोरला.
मोदी चोर आहेत. भाजपची सत्ता गुजरातमध्ये आली म्हणजे याचा अर्थ त्यांची सत्ता संपूर्ण भारतावर आली असा होत नाही.
महाराष्ट्राची निवडणूक अजून बाकी आहे, त्या कधीही लागू शकतात. शरम तो उनको आती है जो शरम को शरमाते है,
ये तो इतने बेशरम है की शरम इनसे शरमाती है, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

 

Web Title :- NCP MLA Amol Mitkari | ncp mla amol mitkari slams eknath shinde fadnavis goverment

 

हे देखील वाचा :

MNS Leader Vasant More | प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी वसंत मोरेंची अनोखी शक्कल, “माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणार्‍यांना …

Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याच्या कार्यालयातून बोलतोय म्हणत पैशांची मागणी

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

 

Related Posts