IMPIMP

Neelam Gorhe Slams Gulabrao Patil | निलम गोर्‍हेंनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं; म्हणाल्या – ‘मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं…,’

by nagesh
Neelam Gorhe Slams Gulabrao Patil | shivsena leader neelam gorhe slams maharashtra minister gulabrao patil in the vidhan parishad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Neelam Gorhe Slams Gulabrao Patil | विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांनी आज भर सभागृहात मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या वर्तनावरून खडसावत ताकीद दिली. गुलाबराव हे मंत्री असूनही तावातावाने आणि छातीवर हात आपटून बोलत होते, यावेळी गोर्‍हे या सातत्याने पाटील यांना शांत राहण्यासाठी विनंती करत होत्या, परंतु मंत्री ऐकण्यास तयार नव्हते. तुम्ही चौकात उभे आहात का, असे उपसभापती म्हणाल्या. यावर, मंत्री आहे, असे पाटील म्हणाले. यावर गोर्‍हे यांनी मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा शब्दात त्यांना सुनावले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. यामुळे सभागृहात विरोधक आणि मंत्री यांच्यात खडाजंगी सुरू आहे. विधान परिषदेत आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर उपसभापती निलम गोर्‍हे चांगल्याच संतापल्या होत्या. (Neelam Gorhe Slams Gulabrao Patil)

 

शिक्षकांच्या बाबतीत निर्णय होऊनही त्यासंबंधीचा निधी थांबवल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या भाषणाच्या पद्धतीवर नीलम गोर्‍हे यांनी आक्षेप घेतला. गुलाबराव पाटील यांना खाली बसण्यासाठी वारंवार सांगूनही ते खाली न बसल्याने निलम गोर्‍हे म्हणाल्या, छातीवर हात बडवून काय बोलता ?

 

शिक्षक प्रश्नावरून गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या,
गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली,
आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे.
संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का ? परत परत सभापतींना सांगावे लागत आहे.
चौकात आहात का तुम्ही ? यावर गुलाबराव पाटील म्हणाले, मी मंत्री आहे.
यामुळे संतापलेल्या उपसभापती निलम गोर्‍हे आणखी संतापल्या आणि म्हणाल्या, मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा.
हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  Neelam Gorhe Slams Gulabrao Patil | shivsena leader neelam gorhe slams maharashtra minister gulabrao patil in the vidhan parishad

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Season | अजित पवारांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री ‘क्लीन बोल्ड’, सरकारची नामुष्की

Weight Loss Tips | ‘हे’ 5 सुगंधी मसाले वेगाने वितळवतात चरबी, सुलटलेले पोट जाईल आत आणि बॉडी होईल स्लीम

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

 

Related Posts