IMPIMP

Weight Loss Tips | ‘हे’ 5 सुगंधी मसाले वेगाने वितळवतात चरबी, सुलटलेले पोट जाईल आत आणि बॉडी होईल स्लीम

by nagesh
Weight Loss Tips | 5 aromatic spices that help in melting belly fat fast if you are troubled by hanging belly then start consuming

सरकारसत्ता ऑनलाइन –  Weight Loss Tips | लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या किंवा सडपातळ तंदुरुस्त शरीर मिळवू इच्छिणार्‍या प्रत्येकाच्या मनात झपाट्याने वजन कसे कमी करायचे किंवा चरबी सहज कशी कमी करायची यासारखे प्रश्न फिरत असतात. बरेच लोक पटकन वजन कमी करण्यासाठी क्रॅश डायटिंग आणि फॅड डाएटचा अवलंब करतात; मात्र, तो आरोग्यदायी पर्याय नाही. (Weight Loss Tips)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्याऐवजी, वजन कमी करण्यासाठी काही हेल्दी फूडचा समावेश करणे चांगले आहे, जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.

 

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असे काही मसाले असतात जे चरबी वितळण्यास मदत करतात. जेवणाची चव वाढवण्यासोबतच हे मसाले तुमचे वाढलेले पोटसुद्धा कमी करू शकतात. अतिरिक्त वजन पटकन कमी करण्यासाठी आहारात या 5 मसाल्यांचा समावेश करा. (Weight Loss Tips)

 

वजन कमी करण्यास मदत करणारे 5 मसाले (5 Spices That Help With Weight Loss)

1) दालचिनी (Cinnamon)
भारतीय स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या दालचिनीमुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. हे अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. एक चमचाभर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, ज्यामुळे चरबी लवकर कमी होते. जेव्हा एखादी व्यक्ती इन्सुलिन रेजिस्टन्ट होते तेव्हा त्या व्यक्तीने सेवन केलेले कार्ब्ज साखरेत बदलतात. दालचिनी हे चक्र तोडण्यास मदत करते.

 

2) बडीशेप (Fennel)
वजन कमी करण्यास मदत करणारा आणखी एक भारतीय मसाला म्हणजे बडीशेप. तुम्ही ती चहामध्येही घालू शकता. ए, सी आणि डी सारख्या जीवनसत्त्वाने समृद्ध असण्याव्यतिरिक्त, बडीशेप चहामध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे तुमचे मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करतात. चांगले पचन निरोगी मार्गाने वजन कमी करण्यास मदत करू शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

3) मेथी (Fenugreek)
मेथी नैसर्गिक फायबरयुक्त असल्याने अन्नाची लालसा कमी करण्यास देखील मदत करू शकते. त्यात भरपूर फायबर असते, यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंध होतो. मेथीमुळे डाएट्री फायबर कॅलरी कमी करण्यास मदत करते. मेथीचे फायबर तृप्तता वाढवून वजन कमी करण्यात मदत करते असे दिसून आले आहे.

 

4) वेलची (Cardamom)
वेलची खाल्ल्याने मेटाबॉलिज्म प्रक्रिया वाढण्यास मदत होते. वेलचीमध्ये मेलाटोनिनसारखे आवश्यक घटक असतात जे मेटाबॉलिज्म रेट वाढविण्यात मदत करतात. जसजसा मेटाबॉलिज्म रेट वाढतो, तसतसे शरीर जलद फॅट बर्न करू लागते आणि अधिक ऊर्जा देते.

 

5) काळी मिरी (Black Pepper)
काळी मिरी तुमच्या शरीरासाठी आश्चर्यकारक काम करते. हा मसाला तुमच्या मेटाबॉलिज्मसाठी बूस्टर आहे.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीमध्ये केवळ चिमूटभर काळी मिरी घाला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा प्या.

 

तुम्ही सकाळी 3 ते 4 काळी मिरी चावून एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता.
काळी मिरी फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध आहे जी अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास हातभार लावू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Tips | 5 aromatic spices that help in melting belly fat fast if you are troubled by hanging belly then start consuming

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कारागृहातून सुटलेल्या आरोपीने कारागृहातील महिला रक्षकालाच घातला गंडा

Blood Sugar | डायबिटीज रूग्णांसाठी लीची ठरू शकते लाभदायक, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत

Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर

 

Related Posts