IMPIMP

National Pension Scheme | सरकारच्या ‘या’ पेन्शन पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर जमा होतील कोटी रुपये; दरमहिना 27,000 च्या जवळपास येईल रक्कम

by nagesh
National Pension Scheme | invest in national pension scheme crores of rupees will be deposited and you will get around rs 27000 every month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था National Pension Scheme | लोक चांगल्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करतात. विशेषत: वृद्धापकाळासाठी लोक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याची योजना आखतात आणि जास्तीत जास्त निधी उभारण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेक वेळा असे घडते की माहितीच्या अभावामुळे लोक योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकत नाहीत, ज्यामुळे पैसे गमावण्याचा धोका असतो तसेच चांगला फंड मिळत नाही. (National Pension Scheme)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जर तुम्ही पेन्शन स्कीम (Pension Scheme) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर इथे तुम्हाला अशा स्कीमबद्दल माहिती दिली जात आहे, जी स्वस्त असण्यासोबतच जास्त निधी देखील देते. ही सरकारी योजना असल्याने त्यातील धोकाही नगण्य आहे.

 

काय आहे ही सरकारी योजना
सरकार सर्व भारतीय नागरिकांच्या चांगल्या भविष्यासाठी एक योजना देते, ज्याला राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा Nation pension System म्हणतात. सरकारी कर्मचार्‍यांपासून ते खासगी क्षेत्रातील कर्मचारीही यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

 

ही अशी योजना आहे, जी केवळ ठराविक कालावधीतच नाही तर उशिरापर्यंतही घेतली जाऊ शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्दिष्टांसाठी ही एक उत्तम पेन्शन योजना आहे. NPS मधील गुंतवणुकीवर, मासिक पेन्शनसह एक मोठा रिटार्मेंट फंड (Retirement fund) एकरकमी उपलब्ध मिळतो.

 

या योजनेची ठळक वैशिष्ट्ये
ही योजना आता कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिस किंवा विमा कंपनीकडून खरेदी करू शकता. विमा कंपनीद्वारे एक करार केला जातो, ज्या अंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System) मध्ये किमान 40 टक्के रक्कमेची एन्युटी खरेदी करणे आवश्यक असते.

 

ही रक्कम जितकी जास्त तितकी पेन्शनची रक्कम जास्त असते. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, एकरकमी रक्कम आणि पेन्शन दरमहा दिली जाते. या योजनेत 60 वर्षांनंतर पेन्शन दिली जाते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

10 हजारांपर्यंतच्या महिन्याच्या गुंतवणुकीवर कॅलक्युलेशन
जर तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी ही योजना सुरू केली आणि दरमहा 10,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली
तर तुम्हाला 25 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
म्हणजेच, वयाच्या 60व्या वर्षानंतर तुमच्याकडे रिटायरमेंट कॉर्पस तयार असेल.

 

10,000 रुपयांच्या मासिक गुंतवणूकीवर वार्षिक 1,20,000 रुपये होतील.
म्हणजेच 25 वर्षात एकूण योगदान 30 लाख रुपये होईल.
या गुंतवणुकीवर तुम्हाला सुमारे 10% रिटर्न मिळू शकतो.
मॅच्युरिटीवर एकूण कॉर्पस रुपये 1.33 कोटी तयार होईल.

 

यासह एन्युटी परचेस 40% असेल, ज्यावर 6% एन्युटी दर दिला जाऊ शकतो.
म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी 26,758 रुपये दरमहा पेन्शन मिळू लागेल.

 

एकरकमी किती मिळेल रक्कम?
या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही 40 टक्के एन्युटी खरेदी केल्यास, 6 टक्के दराने निवृत्तीनंतर,
तुम्हाला 80.27 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल.
53.51 लाख एन्युटीमध्ये जातील. आता याच रकमेवर, तुम्हाला दरमहा 26,758 रुपये मिळत राहतील.
तुमची एन्युटी रक्कम जितकी जास्त असेल तितकी तुम्हाला पेन्शन जास्त मिळेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- National Pension Scheme | invest in national pension scheme crores of rupees will be deposited and you will get around rs 27000 every month

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चुलत भावाचा खून करुन मृतदेह पुरला शेतात, पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 2200 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts