IMPIMP

Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांसाठी विषासारखे आहेत हे खाद्यपदार्थ, जाणून घ्या – काय खावे आणि काय नाही

by nagesh
Blood Sugar | blood sugar patient could not eat maggi sugar and refined flour food know what to eat in diabetes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Blood Sugar | मधुमेह ही एक सामान्य समस्या (Diabetes) बनत चालली आहे. या आजारात रुग्णाला समजत नाही की काय खावे? डॉक्टर म्हणतात, निरोगी आहाराचे पालन केले तर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Blood Sugar Level Control) ठेवू शकता. आता प्रश्न पडतो की ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे? (Blood Sugar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अपोलो हॉस्पिटलचे डॉ. बी. के. रॉय सांगतात की ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी रिफाईंड कार्ब्ज टाळावे लागतील. रिफाईन कार्ब्ज मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासारखे असतात. उदाहरणार्थ, मॅगी, साखर, मैदा यापासून बनवलेल्या सर्व गोष्टी, हे सर्व उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे.

 

यात कोणतेही फायबर नाही, फॅट नाही आणि प्रोटीनचे प्रमाण कमी आहे. ज्याचा वापर रूग्णांनी विचारपूर्वक केला पाहिजे.

 

काय सेवन करावे?

1. हिरव्या भाज्या (Green Vegetables) –
हिरव्या पालेभाज्यांमध्ये कार्ब्ज आणि कॅलरीज कमी असतात. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते. याशिवाय, त्या ब्लड शुगर नियंत्रित करतात. मेथी, पालक, कोबी, ब्रोकोली, शेवग्याची पाने, भेंडी इत्यादी खाऊ शकता. (Green Vegetables For Diabetes)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. जांभूळ –
जांभूळ आणि त्याची पाने दोन्ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे. जांभूळ हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे.
जांभूळमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण जास्त असतो.
जांभूळ हा ताण कमी करण्यास मदत करते. (Blood Sugar)

 

3 धान्य –
धान्य आणि त्याचे पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तुम्ही ब्राऊन राईस, नाचणी, बार्ली, बाजरी इत्यादी खाऊ शकता.

 

4. प्रोटीन (Protein) –
मधुमेहाच्या रुग्णांनी ताटात कमी कार्बोहायड्रेट आणि जास्त प्रोटीने ठेवावीत.
प्रोटीनचे अधिक सेवन केल्याने वजन आणि कोलेस्ट्रॉलही झपाट्याने कमी होते.
अंडी, चिकन, मासे इ. किंवा बीन्स, हरभरा, शेंगदाणे, डाळी, राजमा यांचेही सेवन करू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar patient could not eat maggi sugar and refined flour food know what to eat in diabetes

 

हे देखील वाचा :

Earn Money | IRCTC सोबत सुरू करा ‘हा’ बिझनेस, आरामात बसून कमवा हजारो रुपये महिना

PAN-Aadhaar Card Link | जर तुमच्याकडे सुद्धा असेल अशा प्रकारचे पॅन कार्ड तर होऊ शकतो 10000 रुपयांचा दंड, जाणून घ्या नियम!

PDCC Bank Election Results | राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या आत्माराम कलाटेंचा ‘करेक्ट’ कार्यक्रम, पुणे जिल्हा बँकेत मुळशीतून सुनील चांदेरे विजयी

 

Related Posts