IMPIMP

Online Gaming | मुलांना ऑनलाइन गेमिंगच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी पालक आणि शिक्षकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी

by nagesh
Online Gaming | advisory issued for parents and teachers to protect children from the dangers of online gaming

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Online Gaming | केंद्र सरकार (Central Government) ने मुलांना ऑनलाइन गेमिंगच्या धोक्यांपासून (dangers of online gaming) वाचवण्यासाठी पालक आणि शिक्षकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये गेम डाऊनलोड करताना व्यक्तीगत माहिती न देणे, वेबकॅम, खासगी संदेश किंवा ऑनलाइन चॅटच्या माध्यमातून कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद न साधण्याचा सल्ला दिला आहे. (Online Gaming)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) शुक्रवारी रात्री उशीरा सर्व राज्य, राज्य शिक्षण मंडळे, सीबीएसई बोर्डाला (state education boards and CBSE boards) सेफ ऑनलाइन गेमिंग नावाने ही अ‍ॅडव्हायजरी (Safe Online Gaming advisory) जारी केली आहे. सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन क्लासमुळे मुलांचा मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढला आहे. मुले सायबर बुलिंगमध्ये अडकत आहेत.

Safe Online Gaming advisory मधील महत्वाचे मुद्दे

मुलांना समजवा की, गेम डॉनलोड करताना इंटरनेटवर व्यक्तीगत माहिती देऊ नका. वेब कॅम, खासगी संदेश किंवा ऑनलाइन चॅटच्या माध्यमातून प्रौढ आणि अनोळखी व्यक्तींसोबत संवाद करू नका. यामुळे ऑनलाइन वाईट वर्तन करणार्‍यांशी संपर्काची जोखीम वाढते.

ऑनलाइन खेळ (Online Games) खेळताना जर काही चुकीचे झाले तर ताबडतोब थांबा आणि एक स्क्रीन शॉट घ्या. पोलिसांच्या सायबर सेलमध्ये रिपोर्ट करा. (Online Gaming)

मुलांना ऑनलाईन व्यासपीठावर गोपनीयता राखण्यास शिकवा. म्हणजेच त्यांनी आपले नाव, शाळेचे नाव, जन्मतारीख, कुटुंबाबत माहिती देऊ नये. अकाऊंट बनवताना माहिती लपवा. यास स्क्रीन नाव म्हटले जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

मुले खेळत असलेल्या सर्व खेळांचे एज रेटिंग तपासा.

धमकीच्या प्रकरणात उत्तर देण्यास प्रोत्साहित करा आणि त्रास देणारे संदेश रेकॉर्ड करा, गेम साईट व्यवस्थापकाला रिपोर्ट करा.

मुलांनी कोणतेही अ‍ॅप खरेदी करू नये यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ओटीपी आधारित पेमेंट पालकांनी अवलंबावे.

पालकांनी मुलांना अज्ञात वेबसाइटवरून सॉफ्टवेयर आणि अ‍ॅप डाऊनलोड न करण्याचा सल्ला द्यावा. वेबसाइट्सवर लिंक, प्रतिमा आणि पॉप-अपवर क्लिक करताना सावधगिरी बाळगा. कारण त्यामध्ये व्हायरस असल्यास कम्प्युटरचे नुकसान होऊ शकते. तसेच अश्लील साहित्य सुद्धा असू शकते.

मुले कुंटुबात असलेल्या कम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर करतील याची काळजी घ्या.

मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवा. काही असामान्य आणि वर्तनात बदल दिसला तर त्याच्याशी मित्रासारखे बोलून अडचणी जाणून घ्या.

मुलांना वेळोवळी इंटरनेट तज्ज्ञांद्वारे जागृत करा. जर अशी काही प्रकरणे रिपोर्ट झाली तर त्याबाबत सुद्धा सांगा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Online Gaming | advisory issued for parents and teachers to protect children from the dangers of online gaming

 

हे देखील वाचा :

Identify Fake Notes | तुमच्या खिशात पुन्हा 500 ची बनावट नोट तर आली नाही ना? या पध्दतीनं ओळखा खरी की बनावट; जाणून घ्या (व्हिडिओ)

PMC Jica Project | जायका प्रकल्पाबाबत महत्वाचे निर्णय, तात्काळ होणार ‘या’ सर्व गोष्टी – खासदार गिरीश बापट यांची माहिती

Aadhaar Card धारकांना मिळतेय मोठी सुविधा, स्मार्टफोनमध्ये तात्काळ डाऊनलोड करा ‘आधार’; होईल मोठा फायदा, जाणून घ्या

 

Related Posts