IMPIMP

Kirit Somaiya | ‘अनिल परबांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | BJP leader kirit somaiya tweeted shridhar patankar case money laundering fame chandrakant patel of pushpak group with uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya | महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) नेते, मंत्र्यांवर भाजपचे (BJP) जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आरोप करताना दिसत असतात. याचप्रमाणे सोमय्या यांनी आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आज (शुक्रवारी) केलीय. तसेच, अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचीही मागणी सोमय्या यांनी केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, ‘लोकायुक्तांच्या सुनावणीत हे सिद्ध झालंय की, मंत्री अनिल परब यांनी फसवणूक केली आहे. फसवणुकीने रत्नागिरीमधील दापोली येथील समुद्र तटावर 17800 स्क्वेअर फूटाचे पंच तारांकित रिसॉर्ट बांधलं आहे. या आरोपानंतर अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, असं ते म्हणाले. तर, या भ्रष्टाचारासंदर्भात लोकायुक्त, राज्यपाल, राष्ट्रीय हरीत लवादा, दापोली पोलीस स्टेशन आणि पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार अशा विभिन्न विभागात तक्रार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. असं असूनही अनिल परब (Anil Parab) यांच्यावर कारवाई कधी होणार?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, ‘अनिल परब (Anil Parab) मंत्रिपदावर असताना या प्रकरणाबाबत निर्दोष आणि निष्पक्ष चौकशी होणार नाही.
त्यामुळे अनिल परबांची हकालपट्टी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
दरम्यान, लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने अॅफिडेवीट सुपूर्द केलं आहे.
त्यामध्ये परब यांच्या रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्यात आल्याचा उल्लेख आहे.
2 चौकशींमध्येही आढळून आलंय की, नगर रचना विभागानं सदर जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही.
याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं गेलं होतं. ते पत्र अनिल परब यांचे सहकारी मित्र अधिकाऱ्यांनी महसूल कार्यालयाच्या फाईलमधून गायब केलं होतं,’ असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Kirit Somaiya | expel anil parab from cabinet serious allegations of bjp leader kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | ‘…बिनशर्त माफी मागतो’, नवाब मलिक यांचे वानखेडे प्रकरणात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

Maharashtra Temperature | डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र गारठणार, जाणून घ्या पुण्यातील स्थिती

Nominee | व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होते बँकेत ठेवलेल्या पैशांचे? कोण होतो त्यांचा मालक

 

Related Posts