IMPIMP

Padma Awards 2022 | ‘पद्मश्रीसाठी निवड होणे हे लांच्छनास्पद’, ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी यांनी ‘पद्मश्री’ नाकारला

by nagesh
Padma Awards 2022 | veteran playback singer sandhya mukherjee turns down padma shri award 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPadma Awards 2022 | प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला पद्म (Padma), पद्मश्री आणि पद्मविभूषण
(Padma Bhushan Award) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारकडून (Central Government) देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित
पुरस्कारांसाठी यंदा अनेकांची निवड झाली आहे. मात्र प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी उर्फ संध्या मुखोपाध्याय (Singer Sandhya Mukherjee alias
Sandhya Mukhopadhyay) यांनी पद्मश्री पुरस्कार (Padma Awards 2022) स्विकारण्यास नकार (Refuses) दिला आहे. या सन्मानासाठी त्यांची
संमती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या (Central Government) अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संध्या मुखर्जी यांची मुलगी सौमी सेनगुप्ता (Soumi Sengupta) म्हणाल्या की, त्यांच्या आईने दिल्लीहून फोन केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, त्या प्रजासत्ताक दिनाच्या सन्मान यादीत पद्मश्रीसाठी (Padma Awards 2022 ) नामांकित होण्यास तयार नाही. त्यांच्या संमतीसाठी संध्या यांना संपर्क करण्यात आला होता.

 

 

सौमी सेनगुप्ता पुढे म्हणाल्या, वयाच्या 90 व्या वर्षी जवळपास आठ दशकांची गायन कारकीर्द असताना, पद्मश्रीसठी त्यांची निवड होणे हे लांच्छनास्पद आहे. पद्मश्री एखाद्या नवीन कलाकाराला देणे योग्य आहे की ‘गीताश्री’ असलेल्या संध्या मुखोपाध्याय यांना. त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या गाण्यांच्या सर्व रसिकांना देखील तेच वाटतं. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिल्याचे सेनगुप्ता यांनी सांगितले.

 

 

संध्या मुखोपाध्याय यांनी एसडी बर्मन (SD Burman), मदन मोहन (Madan Mohan), रोशन (Roshan), अनिल बिस्वास (Anil Biswas) आणि सलील चौधरी (Salil Chaudhary) यासारख्या अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसाठी (Music Directors) हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. त्यांना ‘बंग भूषण’सह (Banga Bhushan) अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Padma Awards 2022 | veteran playback singer sandhya mukherjee turns down padma shri award 2022

 

हे देखील वाचा :

Corruption Perceptions Index (CPI) | भारतात किती आहे भ्रष्टाचार ? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केला पाकिस्तानसह अनेक देशांचा डेटा

Tips to Improve Digestion | हिवाळ्यात डायजेशन ठेवायचे असेल ठिक, तर ‘या’ 5 वस्तूंचा दररोजच्या आहारात करा समावेश

WhatsApp Web Account | आता Whatsapp होणार आणखी सुरक्षित, 6 डिजिट पिनशिवाय लॉगिन करू शकणार नाहीत यूजर

WhatsApp Web Account | आता Whatsapp होणार आणखी सुरक्षित, 6 डिजिट पिनशिवाय लॉगिन करू शकणार नाहीत यूजर

Related Posts