IMPIMP

Pak PM Imran Khan | राजकीय उलथापालथ सुरु असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका?; सुरक्षेत केली वाढ

by nagesh
 Pak PM Imran Khan | PAK PM imran khan security increased amid political upheaval in pakistan intelligence report said threat to life

सरकारसत्ता ऑनलाइन – Pak PM Imran Khan | पाकिस्तान (Pakistan) राजकीयदृष्ट्या कायमच अस्थिर असतो. दर काही वर्षांनी पाकिस्तानात राजकीय संकट उद्भवतं आणि त्याला कोणी ना कोणी बळी पडत असतं. दरम्यान गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pak PM Imran Khan) यांच्या सत्तेवर राजकीय संकट घोंगावत आहे. इम्रान खान विरोधात विरोधी पक्षांनी पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यान आता इम्रान खान यांच्यावर संभाव्य हल्ल्याची गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पंतप्रधान इम्रान खान (Pak PM Imran Khan) यांनी काल राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर स्पष्ट केले की, ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरच खुर्ची सोडणार आहेत. दरम्यान, इम्रान खान यांच्यावर हल्ला होऊ शकतो आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी दिली.

 

 

मागील काही दिवसांपासून इम्रान खान हे सरकार पाडण्यामागे परकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करत, त्याबाबत पत्र दाखवत होते. त्याचबरोबर इम्रान खान यांनी दावा केला होता की, पत्रात त्यांना भूमिका बदलण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत आणि तसे न केल्यास त्यांना सत्तेतून बेदखल केले जाईल, असं म्हटलं होतं. मात्र यावेळी थेट अमेरिकेचे नाव घेत रशिया आणि चीनसोबत पाकिस्तानची असलेली जवळीक अमेरिकेला सहन होत नाही, असं देखील इम्रान खान यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, इम्रान खान यांचं पद वाचवण्यासाठी 342 सदस्यीय पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमतासाठी 172 मतांची आवश्यकता आहे.
मुताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तानने पाठिंबा काढून घेतल्यानंतर सत्ताधारी आघाडीकडे फक्त 164 खासदार आहेत,
तसेच, विरोधी पक्ष 177 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहेत,
पण, त्यापैकी केवळ 172 संसदेत पोहोचले आहेत. यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pak PM Imran Khan | PAK PM imran khan security increased amid political upheaval in pakistan intelligence report said threat to life

 

हे देखील वाचा :

Pune News | देहूमध्ये मांस, मच्छीवर बंदी ! नियमांचं पालन न केल्यास कारवाई !

Pune Crime | मंगळवार पेठेतील कोंबडीपुलावर तरुणावर कोयत्याने सपासप वार; 4 जणांवर गुन्हा, एकाला अटक

Chandrakant Patil | ‘गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला देऊ नका, हा सल्ला मुख्यमंत्र्यांना आधीच दिला होता’

Chitra Wagh | ‘इतिहास सांगतो आमुच्या स्त्रीने….’; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा महाडिकांना घरचा आहेर

 

Related Posts