IMPIMP

PAN Card New Rule | घरबसल्या करता येणार PAN कार्डमध्ये बदल; नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या

by nagesh
PAN Card | how to download pan card in smartphone know the process here

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – PAN Card New Rule | जसे आधार कार्ड (Aadhaar Card) महत्वाचे कागदपत्र आहे. तसेच पॅन कार्ड (PAN Card) देखील एक सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कार्डवर दहा अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांक (Alphanumeric PAN number) असतो. या व्यतिरिक्त आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही. दरम्यान PAN कार्डमध्ये तुम्ही बदल (PAN Card New Rule) देखील करू शकणार आहात. याबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पॅन कार्ड आयकर प्राधिकरणाला व्यक्ती अथवा कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा रेकॉर्ड ठेवते. त्यामुळे करचुकवेगिरीची शक्यता कमी होण्यास मदत होते. पॅन कार्डमधील पत्ता अथवा आडनाव बदलण्यासाठी कार्डधारकांना 110 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर अनेक कामांसाठी पॅनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जातो. युजर लग्नानंतर पॅन कार्डवरील आडनाव आणि पत्ता देखील बदलू शकतात. बँक असो किंवा इतर कोणताही आर्थिक व्यवहार असो, तुमचा पॅन क्रमांक देणे बंधनकारक असतो. (PAN Card New Rule)

 

घरबसल्या पॅन कार्डवर बदल करण्यासाठीची प्रक्रिया –

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड https://nsdl.co.in/ च्या वेबसाइटवर जा.

Correction in Existing PAN पर्याय निवडा

कैटेगरी टाइप पर्याय निवडा

योग्य नाव आणि अचूक शब्दलेखन असलेली कागदपत्रे जोडा.

पत्ता किंवा आडनाव बदलण्यासाठी, कार्डधारकांना 110 रुपये शुल्क द्यावे लागेल.

NSDL पत्त्यावर सबमिट पर्यायावर क्लिक करा / इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिसेस UNIT (NSDL e-Governance Infrastructure Limited द्वारे व्यवस्थापित) वर अर्ज पाठवा.

अपडेट केलेले पॅन कार्ड अर्ज केल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पॅन-आधार लिंक करणे आवश्यक –

आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक केले नसेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. पॅन-आधार लिंक न केल्यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लवकर लिंक करणे आवश्यक आहे.

 

Web Title :- PAN Card New Rule | pan card new rule change at online learn the simplest method marathi news

 

हे देखील वाचा :

UPI Payments Without Internet | विना इंटरनेट सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट, जाणून घ्या सोपी पद्धत

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरबाबत मोठं अपडेट आलं समोर, सरकारी कर्मचार्‍यांचा वाढणार किमान मूळ पगार

Pune Police | हॉटेल प्यासा येथे तरुणावर सत्तुराने वार, फरार झालेल्या 4 आरोपींना अटक

 

Related Posts