IMPIMP

Pankaja Munde | ‘इथे वादळ येणार होते पण…’, खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंच सूचक विधान

by nagesh
Pankaja Munde | ncp leader eknath khadse meet bjp leader pankaja munde on gopinath gad

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज (3 जून) नववा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) गोपीनाथ गडावर गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भेट घेतली. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सूचक विधान केलं आहे. इथे वादळ येणार होतं, पण त्याची दिशा बदलली, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, मुंडे साहेबांचं जीवन वादळी होतं आणि मी वादळाची लेक आहे. आता इथे वादळ येणार होतं त्याची दिशा बदलली आहे, असं विधान त्यांनी केलं. त्यामुळे नेमकी वादळाची दिशा कोणी बदलली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics News) उपस्थित केला जात आहे. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या चर्चेनंतर वादळाची दिशा बदलली का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

म्हणून नाथाभाऊ भेटीला आले – पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या, तीन जून हा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी आज कोणत्याही राजकीय नेत्याला इथे निमंत्रीत केले नाही. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या निष्पाप लोकांनी हा कार्यक्रम ठेवला आहे. नाथाभाऊ यांचं मुंडेसाहेबांवर प्रेम आहे. म्हणून नाथाभाऊ भेटीसाठी आले. ते कोरोना काळात येऊ शकले नव्हते. ते मुंडेसाहेबांचे सहकारी होते, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

ही कौटुंबीक भेट होती – खडसे

पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, पंकजा मुंडे आणि आपली कौटूंबिक भेट आहे.
याचा राजकारणाशी काही संबंध नाही. मात्र पंकजा मुंडे यांची सध्या भाजपामध्ये झालेली स्थिती पाहून आपल्याला वेदना होत
असल्याचे खडसे म्हणाले. ते पुढे म्हणाले, भाजपाने संधीसाधू लोकांना जवळ केले
आणि माझ्या सारख्यांना व पंकजा मुंडे यांना दूर केले आहे, अशी खदखद खडसे यांनी व्यक्त केली.

Web Title : Pankaja Munde | ncp leader eknath khadse meet bjp leader pankaja munde on gopinath gad

Related Posts