IMPIMP

अटक न करण्यासाठी परमबीर सिंह यांनी 10 कोटीची केली होती मागणी, सट्टेबाज सोनू जालाननं नोंदवला जबाब

by nagesh
parambir singh | fourth summons to parambir singh for present front of chandiwal commission

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण आता परमबीर सिंह यांच्यावर एक नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे नोंदवलेल्या जबाबानुसार एखाद्या मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना १० कोटी रुपये दे असं परमबीर सिंह parambir singh यांनी मला सांगितलं होतं असा जबाब सोनू जलान याने नोंदवला आहे.

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

परमबीर सिंह parambir singh यांच्यावरील आरोपावरून सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या दरम्यान, मे २०१८ मध्ये एका सट्टेबाजीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ‘अँटी-एक्स्टॉर्शन सेल’ ने त्याला अटक केली होती. त्यानंतर आपल्याला तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे नेण्यात आलं होतं. पुढे जालान यानं सांगितलं की, परमबीर सिंह यांनी मला भारतातील सक्रिय क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्यांची माहिती विचारली. तसेच, मला कुटुंबियातल्या सदस्यांसह एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेपासून बचाव करायचा असेल तर प्रदीप शर्मा यांना १० कोटी देण्यास सांगितल्याचा आरोप जालाननं जबाबात केला आहे.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मा या दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आहे. जालानं यानं सिंह, प्रदीप शर्मा आणि पीआय राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप केलेत.
या आरोपांची सध्या CID चौकशी केली जाते.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Related Posts