IMPIMP

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

by nagesh
Parbhani Crime News | a well educated married woman aborted by giving ayurvedic medicine husband threatened to kill him

परभणी : सरकारसत्ता ऑनलाईन  Parbhani Crime News | परभणी जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
यामध्ये एका विवाहितेला आयुर्वेदिक औषध देऊन सासरच्या मंडळींनी तिचा गर्भपात केला आहे. सासरची मंडळी तिच्याकडे घर बांधण्यासाठी
माहेरवरून तीन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत होते. तसेच तिचा छळ करत होते. यादरम्यान पीडित विवाहित महिला गर्भवती राहिल्याने
सासरच्या मंडळींनी तिचा गर्भपात केला आहे. या प्रकरणी उच्चशिक्षित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात गंगाखेड पोलीस
ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वकील असलेल्या माधुरी टिळकीकर (Advocate Madhuri Tilkikar) यांचे लग्न 27 जून 2021 रोजी नांदेडच्या हडकोमधील शाहू नगरमध्ये राहणाऱ्या स्वप्निल मधुकर टिळकीकर यांच्याशी झाले. लग्न झाल्यानंतर माधुरी यांचे काही दिवस सुखात गेले. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. सासू आणि पतीने तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) सुरू केली. तुला काम येत नाही, तुला कपडे धुता येत नाहीत, तुला स्वयंपाक करता येत नाही, असे म्हणत माधुरीला किचनमध्ये जाण्यापासून अडवत होते. यानंतर सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरवरून तीन लाख रुपये घेऊन ये असा तगादा माधुरीकडे लावला व तिचा छळ सुरु केला.

 

यानंतर ज्यांच्यासोबत सात फेरे घेतले त्या पतीनेदेखील तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
(Threats to kill) दिली. हा सर्व प्रकार सुरू असताना माधुरी टिळकीकर या गर्भवती (Pregnant) राहिल्या.
यानंतर सासरच्या मंडळींनी आपली हद्द क्रॉस करत त्यांना आयुर्वेदिक औषध (Ayurvedic Medicine) देऊन
त्यांचा गर्भपात (Abortion) केला. यानंतर या सगळ्या जाचाला कंटाळलेल्या माधुरी टिळकीकर यांनी गंगाखेड
पोलीस ठाण्यात आपल्या सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्नील टिळकीकर,
मधुकर टिळकीकर, आम्रपाली टिळकीकर, सोनाली मुळे, प्रशांत उर्फ गजु गवळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गंगाखेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Parbhani Crime News | a well educated married woman aborted by giving ayurvedic medicine husband threatened to kill him

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध टाकून महिलेवर केला बलात्कार; जबरदस्तीने लग्न करायला लावून मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | फुरसुंगी रोडवरील लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘सासु’ने केली 5 महिलांची सुटका

Pune PMC News | ग्रामस्थांच्या विरोधानंतरही शासनाच्या दबावाखाली महापालिकेची फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; शहर सुधारणा समितीमध्ये दोन्ही गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर

 

Related Posts