IMPIMP

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांचा सलग दुसरा विजय

by nagesh
Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | 'Pay Fair Trophy' Championship Under 13 Children's Cricket Tournament! Cricket Next Academy, 30 Yards Cricket Academy teams second win in a row

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | क्रिकेट चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी आणि ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत युग सोनिग्रा याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १४ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने १४६ धावांचे आव्हान उभे केले. युग सोनिग्रा (३२ धावा), अन्श सांगवी (नाबाद ३५ धावा) आणि श्रवण देसाई (२६ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. सहाव्या गड्यासाठी युग आणि अन्श यांनी ३७ चेंडूत ६८ धावांची भागिदारी करून संघाला १४६ धावांचे आव्हान उभे करण्यास मदत केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १३२ धावांवर मर्यादित राहीला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

 

विहान सुतार याच्या कामगिरीच्या जोरावर ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ए.के. स्पोर्टस् संघाचा १८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्वराज शेलार (२७ धावा) आणि विहान सुतार (नाबाद ३६ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १६३ धावांचे आव्हान उभे केले. ए.के. स्पोर्ट्स संघाचे सलामीवीर पृथ्वीराज खांडवे (५४ धावा) आणि राजवीर देशमुख (४९ धावा) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर संघाला आवश्यक धावगती राखता आली नाही. एके स्पोर्ट्स सघाचा डाव १४५ धावांवर मर्यादित राहीला.

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १४६ धावा (युग सोनिग्रा ३२, अन्श सांगवी नाबाद ३५, श्रवण देसाई २६,
ताहीर अली २-३१);(भागिदारीः सहाव्या गड्यासाठी युग आणि अन्श ६८ (३७) वि.वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः
२५ षटकात ७ गडी बाद १३२ धावा (कुलवंश वाकोडे २९, आर्यन पेंडसे २०, युग सोनिग्रा १-१८); सामनावीरः युग सोनिग्रा;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ९ गडी बाद १६३ धावा (स्वराज शेलार २७, विहान सुतार नाबाद ३६, श्रेय असलेकर १७, सोहम सावंत ४-१८) वि.वि. ए.के. स्पोर्ट्सः २५ षटकात ५ गडी बाद १४५ धावा (पृथ्वीराज खांडवे ५४ (४०, ११ चौकार), राजवीर देशमुख ४९, विहान सुतार २-२१); सामनावीरः विहान सुतार;

 

 

Web Title :- Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship Under 13 Children’s Cricket Tournament! Cricket Next Academy, 30 Yards Cricket Academy teams second win in a row

 

हे देखील वाचा :

Sunny XI Karandak | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! आर्यन क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय !!

Basava Seva Pratishthan | महात्मा बसवण्णा स्थापित ‘अनुभव मंटप’ ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी; प्रसिध्द व्याख्याते बसवकुमार पाटील यांचे प्रतिपादन

Journalist Amol Kavitkar | भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर

Pune Police Crime News | अवैध धंद्यांबाबत DG कंट्रोलकडून शहर नियंत्रण कक्षात ‘कॉल’, पोलिस आयुक्तांचे ‘क्रॉस रेड’ करण्याचे उपायुक्तांना आदेश

 

Related Posts