IMPIMP

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात करून किती मिळाला दिलासा? वाढीच्या तुलनेत किरकोळ आहे घसरण, जाणून घ्या पूर्ण गणित

by nagesh
Petrol-Diesel Prices Today | petrol diesel price today on 12 may 2022 check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती (Petrol Diesel Price) मुळे त्रस्त झालेल्या देशातील जनतेला दिवाळीत केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर काही राज्य सरकारांनी आपल्या वाट्यातील वॅटची कपात केली, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरण दिसून आली. मे 2020 पासून आतापर्यंत तेलाच्या किमतीचे पूर्ण गणित जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

36 दिवसात पेट्रोल 8.65 रुपये प्रति लीटर महागले

 

पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) 28 सप्टेंबर 2021 पासून 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत खुप वेगाने वाढल्या.
28 सप्टेंबरला पेट्रोल दिल्लीत 101.39 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.57 रुपये प्रति लीटर विकले जात होते.

 

तर, 2 नोव्हेंबरला राष्ट्रीय राजधानी दिल्ली पेट्रोलची किंमत 110.04 रुपये आणि डिझेल 98.42 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचली.
म्हणजे या 36 दिवसात पेट्रोल 8.65 रुपये आणि डिझेल 8.85 रुपये प्रति लीटर महागले होते.

 

5 मे 2020 पासून किती महागले इंधन

 

कोविडमुळे देशाच्या विविध भागात लॉकडाऊन लावावा लागला होता.
ज्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीपासून कारखान्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी काम प्रभावित झाले.
याचा परिणाम सरकारच्या कमाईवर सुद्धा झाला.
या काळात पेट्रोल आणि डिझेलमधून मिळणारा पैसा सरकारसाठी उपयोगी पडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

5 मे 2020 पासून आताच्या ताज्या कपातीपर्यंत पेट्रोल (Petrol) 38.78 रुपये महागले आहे. तर, डिझेल (Diesel) च्या दरात 29.03 रुपयांची वाढ झाली होती.
या दरम्यान एक्साईज ड्यूटीद्वारे सरकारने पेट्रोलवर 32.9 रुपये प्रति लीटर आणि डिझलेवर 31.8 रुपये प्रति लीटरची कमाई केली होती.

 

Web Title : Petrol Diesel Price | how much relief from reduction in petrol and diesel prices the decline is slight compared to the increase

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरण : वसुलीची रक्कम हवालामार्फत देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध 27 कंपन्या वळवल्याचा ED ला संशय

Jandhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर अशाप्रकारे चेक करा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

Cryptocurrency | Bitcoin, Ether, Shiba Inu मध्ये घसरण, Solana, Cardano मध्ये आली तेजी, जाणून घ्या नवीन भाव

 

Related Posts