IMPIMP

Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरण : वसुलीची रक्कम हवालामार्फत देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध 27 कंपन्या वळवल्याचा ED ला संशय

by nagesh
Anil Deshmukh Money Laundering Case | ed names anil deshmukh as main accused in the 7000 pages chargesheet filed in the money laundering case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED) सोमवारी मध्यरात्री अटक केली. मात्र ठोस अशी काहीही माहिती समोर आलेली नव्हती. पण आता वसुलीतील रक्कम हवालामार्फत देशमुख (Anil Deshmukh) यांच्या निकटवर्तीयांच्या विविध २७ कंपन्यांमध्ये वळवल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे. यातील कंपन्या बहुतांश शेल असून, काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी त्यांचा वापर केल्याचे गृहीत धरून ईडीने तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान या कंपन्यांशी देशमुख यांचा थेट संबंध नसला तरी या कंपन्यांत त्यांच्यामुळे आर्थिक गुंतवणूक झाली आहे. त्या अनुषंगानेही तपास करण्यात येत आहे. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे १३ आणि नातेवाईक, तसेच जवळच्या मित्रांच्या नावे १४ कंपन्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये व्यवसाय नसला तरी त्यांच्या अस्तित्त्वातून काळा पैसा व्यवहारात आणल्याचा संशय ईडीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

न्यायाधीश चांदीवाल आयोगा (chandiwal commission) समोरही या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
२२ ऑक्टोबरच्या सुनावणीत आयपीएस अधिकारी (IPS Officer) परमबीर सिंग ({Parambir Singh) यांनी मी माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे.
आता त्यासंदर्भात मला आणखी काही पुरावे द्यायचे नाहीत, तसेच उलटतपासणीही करायची नाही, असे लेखी कळविले होते.
इतकच नाही तर त्यांनी आयोगासमोर साक्षीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी असेही त्यांनी म्हंटले होते.
साक्षीसाठी आयोगाने परमबीर सिंग (Parambir Singh) यांना वेळोवेळी समन्स बजावले होते.
हजर न राहिल्याने दंडही ठोठावला होता. मात्र आता चांदीवाल आयोग कोणती भूमिका घेतो.
यावर राज्य सरकारने (Maharashtra Government) सुरू केलेल्या या चौकशीचे भवितव्य ठरणार आहे.

 

दोन वेगवेगळ्या चौकशा

 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चांदीवाल आयोगाच्या चौकशीसोबतच केंद्रीय तपास यंत्रांकडूनही चौकशी होत आहे.
त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर बोलताना ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी सांगितले की, सध्या ते एका प्रकरणात ईडीच्या ताब्यात आहेत.
मात्र त्या अटकेचा आणि चांदीवाल आयोगाच्या चौकशीचा एकमेकांशी संबंध नाही.

 

Web Title : Anil Deshmukh | where exactly did former home minister anil deshmukh keep recovery money ed investigation start

 

हे देखील वाचा :

Jandhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर अशाप्रकारे चेक करा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

Cryptocurrency | Bitcoin, Ether, Shiba Inu मध्ये घसरण, Solana, Cardano मध्ये आली तेजी, जाणून घ्या नवीन भाव

Pune Crime | अश्लिल बोलून 12 वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारुन विनयभंग, सराईत गुन्हेगारावर FIR

 

Related Posts