IMPIMP

Petrol Diesel Price | दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 42 पैशांनी तर डिझेल 57 पैशांनी महागले

by nagesh
Petrol Diesel Prices Increased In Pune | Petrol Diesel Fuel Prices Increased In Pune For Third Time In Four Days

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Petrol Diesel Price | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी उंच गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर ४२ पैशांनी तर, डिझेल लिटरमागे ५७ पैशांनी महागले (Petrol Diesel Price) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने इंधनाची दरवाढ रोखून धरली होती. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासून इंधनाची दरवाढ होऊ लागली. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. त्यानंतर गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीला आळा बसला होता. एक दोनदा तर चक्क दरकपातही झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा भाववाढ (Petrol Diesel Price) होण्यास सुरुवात झाली आहे.

बुधवारी पेट्रोलमध्ये १७ पैशांनी तर डिझेलमध्ये २६ पैशांनी लिटरमागे वाढ झाली होती.
गुरुवारी पेट्रोल प्रति लिटर २५ पैशांनी महागले आहे. पुणे शहरात आता पेट्रोलचा दर १०७.२५ रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
डिझेलचा दर ९५.५७ रुपये लिटर इतका झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पॉवर पेट्रोलच्या दरात दोन दिवसात ४० पैशांची वाढ झाली आहे.
आता पुणे शहरात पॉवर पेट्रोलचा दर ११०.९२ रुपये लिटर झाला आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढू लागल्याने देशात पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी ८ ते १० रुपयांची पुढील काळात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title : Petrol Diesel Price | In two days, petrol became costlier by 42 paise per liter and diesel by 57 paise

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरात डोक्यात वीट पडून महिलेचा मृत्यु

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

 

Related Posts