IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार ! शारीरीक संबंधाचे ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

by nagesh
Pune Crime | 16 year old girl threatened and repeatedly raped by step father in wadgaon sheri wagholi area of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | घरी आलेल्या तरुणाने खाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार (Rape) केला़ त्यावेळचे शारीरीक संबंधाचे फोटो काढून ते पतीला दाखविण्याचा भिती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (hinjewadi police) सौरभ संतोष श्रीवास्तव Saurabh Santosh Srivastava (वय २९, रा. गोरखपूर) याच्याविरुद्ध
गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. या तरुणाने औंध (Aundh) येथे बुधवारी फिर्यादी महिलेचा टीशर्ट सार्वजनिक जागेत फाडून मारहाण केली. या
कृत्यामुळे तिने आपल्यावर गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराची कहाणी पोलिसांना विशद केली.

ही महिला २६ एप्रिल २०२० रोजी घरी असताना सौरभ श्रीवास्तव हा मांरुजी येथील घरी आला होता. त्याने खाण्यातून कोणतेतरी गुंगीकारक पदार्थ फिर्यादी यांना दिला. त्यामुळे फिर्यादी यांची शुद्ध हरपली. त्यानंतर सौरभ याने त्यांच्यावर बलात्कार केला. त्यांचे विवस्त्र फोटो काढले. हे फोटो तुझ्या पतीला पाठवितो, असे फिर्यादी यांना सतत धमकावून त्यांच्यावर तेव्हापासून १४ जून २०२१पर्यंत वारंवार अत्याचार केला. तसेच त्यांच्या खात्यातून जबरदस्तीने ४४ हजार रुपये स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करुन अपहार केला. बुधवारी त्याने भर रस्त्यात फिर्यादी यांचा टीशर्ट फाडून त्यांना मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक बोरकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Woman raped in Pune Threats to make naked photos of physical relations viral

 

हे देखील वाचा :

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान

 

Related Posts